Influencer marketing: भारतामध्ये मागील काही वर्षात डिजिटल क्रांती घडून आली आहे. 2030 पर्यंत देशातील इंटरनेट युझर्सची संख्या 100 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आल्याने सोशल मीडियासह विविध माध्यमांवर माहितीचा पूर आला आहे. युट्यूब व्हिडिओ, पॉडकास्ट, रिल्स, ग्राफिक आणि टेक्स्टसह विविध प्रकारचा कंटेट युझरसमोर आला. अनेक कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर यातून पुढे आले.
डिजिटल मीडियाने 'सेलिब्रिटी'ची व्याख्या बदलली
भारतात 30 ते 40 लाख इन्फ्लूएन्सर्स असल्याचे Redseer या कंपनीने केलेल्या अहवालात म्हटले आहे. डिजिटल मीडियाचा प्रसार सुरू होण्याआधी अभिनेते, टीव्ही सेलिब्रिटी, क्रिकेटर आणि इतर काही मोजके इन्फ्लूएन्सर्स होते. मात्र, आता डिजिटल युगात क्रिएटर्ससुद्धा सेलिब्रिटी झाले आहेत. यांचा वापर कंपन्या उत्पादने आणि सेवा प्रमोट करण्यासाठी तसेच ब्रँड अँम्बेसिडर म्हणून करत आहेत.
सध्या इन्फ्लूएन्सर्स द्वारे होणाऱ्या ब्रँडिग आणि मार्केटिंगचा एकूण जाहिरातींतील वाटा 5% आहे. हे प्रमाण वार्षिक 45 टक्क्यांनी वाढत असून 2027 पर्यंत एकूण इन्फ्लूएन्सर जाहिरातींचा वाटा 13 टक्के होईल, असे अहवालात म्हटले आहे.
इन्फ्लूएन्सर मार्केटिंग क्षेत्र किती मोठे होईल?
Redseer ने वर्तवलेल्या अंदाजानुसार 2028 पर्यंत इन्फ्लूएन्सर मार्केटिंग क्षेत्र 350 कोटी डॉलरपर्यंत जाऊ शकते. येत्या काळात कंपन्या आपली उत्पादने आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त इन्फ्लूएसर मार्केटिंगचा वापर करतील. सोशल मीडिया क्रिएटर्सची विश्वासहर्ता जास्त असते. त्याचा कंपन्या जास्तीत जास्त फायदा उचलतील, असे अभ्यासात म्हटले आहे. 2028 पर्यंत डिजिटल जाहिरातींवर कंपन्यांचा एकूण खर्च 2 हजार कोटी डॉलरपेक्षा जास्त होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स कसे बनू शकता?
डिजिटल जाहिराती आणि सोशल मीडिया कंटेट दिवसेंदिवस वाढत असताना तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स बनू शकता. यातून चांगले पैसेही कमावता येतील. त्यासाठी तुम्हाला योग्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि कोणत्या प्रकारचा कंटेट बनवणार आहात, हे निश्चित करावे लागेल. सातत्याने एकाच विषयासंबंधी कंटेट पोस्ट करत राहिला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल. इन्फ्लूएन्सर म्हणून पुढे येण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असू शकते. त्यामुळे कंटेट पोस्टिंगमधील सातत्य अत्यंत गरजेचे आहे.
तुम्ही कोणत्या प्रकारचा कंटेट तयार करत आहात यावर ध्यान द्यावे लागेल. योग्य स्टॅटेजी आखून कंटेट तयार केल्यास त्याचे रिझर्ट दिसतील. फॉलोवर्सची संख्या वाढल्यानंतर विविध ब्रँड्स तुमच्यापर्यंत जाहिरातीसाठी येतील. युट्युब, इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवर असे अनेक इन्फ्लूएन्सर आहेत. उत्पादन आणि सेवा प्रमोट करण्यासाठी तुम्ही कंपन्यांकडून पैसे आकारू शकता. जेवढे जास्त फॉलोवर्स तेवढे जास्त पैसे तुम्ही जाहिरातीसाठी मागू शकता. फायनान्स, ऑटो, मनोरंजन, फॅशन, करिअर, ट्रॅव्हल अशा विविध क्षेत्रातील इन्फ्लूएन्सर्स तुम्ही पाहतच असाल.