महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्राच्या (industries in Maharashtra) बाबतीत एक आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात आणखी 40000 कोटी गुंतवणुकीच्या (investments) विविध प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. या विविध प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात तब्बल 1,20,000 रोजगारांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील अर्थकारणाला आणखी गती मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याने तरुणांना मोठ्या प्रमाणात काम मिळू शकणार आहे.
कुठे होणार गुंतवणूक (investments)
राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या गुंतवणुकीचे प्रकल्प हे प्रामुख्याने पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागात होणार आहेत. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूकही 40 हजार कोटी रुपये इतकी असले. या प्रकल्पांची निर्मिती झाल्यास राज्यात सुमारे 1 लाख 20 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
कोणकोणत्या प्रकल्पांचा समावेश-
राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या या प्रकल्पामध्ये पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल (electric vehicles) आणि बॅटरी निर्मिती प्रकल्प होणार आहेत. यासाठी सुमारे 12,482 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये तैवानस्थित गोगोरो या कंपनीकडून पुणे आणि संभाजीनगर या दोन औद्योगिक शहरामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मितीचे प्लांट उभे केले जाणार आहेत. गोगोरो इंडियाने (Gogoro India) संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 12,000 बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधांना चालना मिळण्यास मदत होईल. तसेच इलेक्ट्रीक दुचाकी निर्मिती एथर एनर्जी (Ather Energy) या कंपनीकडून ₹865-कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तर पिनॅकल मोबिलिटी पुण्यात ₹776-कोटी यूनिट उभारणार आहे.
जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क-Gems and Jewellery park
नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्कला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. तब्बल 21 एकर जागेवरील इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्कचा या गुंतवणूक प्रस्तावांमध्ये समावेश आहे. जेम्स अँड ज्वेलरी प्रमोशन कौन्सिलद्वारे विकसित करण्यात येणार्या या पार्कमध्ये एकूण 1354 औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापने असतील. या प्रकल्पातून 20,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच या प्रकल्पातून एक लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी ग्रीन डायमंड म्हणजे प्रयोगशाळेत निर्मिती करण्यात आलेले हिरे येथील काही काही युनिट्समध्ये ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. या जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे रत्ने आणि दागिने उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
रायगड, अहमदनगर, सातारा, नंदुरबारमध्येही गुंतवणूक-
याशिवाय, रसायन और रासायनिक उत्पादन निर्मिती क्षेत्रातील परफॉर्मन्स केमिसर्व कंपनी (Performance Chemserve Limited) आणि स्मार्टकेम टेक्नोलॉजी लिमिटेड Smartchem Technologies Limited अनुक्रमे ₹2,700 कोटी आणि ₹2,033 कोटींच्या गुंतवणुकीने रायगडमध्ये युनिट्सची निर्मिती करणार आहेत. जनरल पॉलीफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड(General Polyfilms Private Limited) या कंपनीकडून नंदुरबारमध्ये ₹500 कोटींचा प्लांट उभा केला जाणार आहे. तर विप्रो (Wipro)प्रायव्हेट लिमिटेड साताऱ्यातील एका युनिटसाठी ₹544 कोटी आणि गणराज इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदनगरमध्ये ₹110 कोटी खर्चून प्लांट उभारणार आहे.