Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paper Bag Business : पर्यावरणपूरक पेपर बॅगच्या व्यवसायातून मिळवू शकता, दरमहा 70 हजार रुपयांपर्यंतचा नफा

Paper Bag Business

Image Source : www.giftabled.com

Paper Bag Business : सध्या बाजारात कागदी पिशव्यांची मागणी खूप आहे. प्लास्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांच्या वापराला चालना दिली जात आहे. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पेपर बॅग व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या, त्यासाठी किती खर्च येईल?

Paper Bag Business : प्लॅस्टिक हे पर्यावरण प्रदूषित करण्याचे प्रमुख कारण आहे. सरकारनेही अनेकवेळा त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने प्लॅस्टिकची जागा कोणीही घेऊ शकलेली नाही. बंदी असतानाही त्याचा वापर अजूनही केला जात आहे. प्लॅस्टिक पिशवीला पर्याय म्हणून कागदी पिशवी आणि कापडी पिशवी आहेत. पर्यावरणप्रेमी नक्कीच कागदी आणि कापडी पिशवी वापरतात.

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कागदी पिशवीचा व्यवसाय सुरू करू शकता. आजकाल लोक प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरत आहेत. पेपर बॅगचा व्यवसाय करून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. याच्या मदतीने तुम्ही वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच दरमहा 75 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. त्याचबरोबर लवकरच प्लास्टिक बंदी आणखी कडक होणार आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता आहे. हा व्यवसाय कसा सुरू करायचा? किती खर्च येईल? उत्पन्न किती होईल? याबाबत माहित करून घ्या. 

हा व्यवसाय कसा सुरू करायचा?

कागदी पिशवीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींची गरज आहे, प्रामुख्याने पेपर रोल, पॉलिमर स्टिरिओ, फ्लेक्सो कलर आणि पेपर बॅग बनवण्याचे मशीन इत्यादींची आवश्यकता असेल. या सर्व गोष्टी तुम्ही बाजारातून मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता. तुम्ही याच प्रकारचे कागदी पिशवी बनवण्याची मशीन विकत घेतली तर ते तुम्हाला 3.5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत मिळेल. ते तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता. 

एका मशीनमधून 3-4 आकाराच्या पिशव्या बनवता येतात, परंतु जसजसा आकार वाढत जाईल तसतशी वेगवेगळ्या मशीनची आवश्यकता असेल. त्याच वेळी, तुम्हाला आयलेट पंचिंग मशीनची देखील आवश्यकता असेल, ज्याच्या मदतीने तुम्ही कागदी पिशव्यांवर हँडल लावू शकता. या मशीनवरही तुम्हाला 1.5-2 लाख रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय ही यंत्रे बसवण्यासाठी जागा, ती चालवण्यासाठी वीज आणि काही मजुरांची गरज आहे.

paper-bag-internal-image.jpg
पेपर बॅग बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन

मशिनशिवायही कागदी पिशव्या तयार करता येतात

जर तुमच्याकडे कागदी पिशवी बनवण्याची मशीन  घेण्याचे बजेट नसेल, तर तुम्ही ती सहज हाताने बनवू शकता. कागदी पिशव्या घरी बनवणे खूप सोपे आहे आणि त्याची किंमतही खूप कमी आहे. यासाठी तुम्हाला मशिनऐवजी गोंद, कात्री, पंचिंग मशिन इ.सह उर्वरित साहित्याची आवश्यकता असेल. तुमचे उत्पादन मशीनच्या तुलनेत थोडे कमी असेल.

स्टार्टअप इंडिया अंतर्गत कर्ज मिळू शकते 

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही यासाठी सहज कर्ज मिळवू शकता. केंद्र सरकार नवीन स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया अंतर्गत कर्ज देत आहे. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सध्या बाजारात कागदी पिशव्यांची मागणी खूप आहे. अनेक मोठे ब्रँड आणि दुकानदार आजकाल प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या वापरतात. 

अशा परिस्थितीत तुम्ही या व्यवसायातून मोठी कमाई करू शकता. त्याचबरोबर कागदी पिशव्या बनवण्यासाठी केंद्र सरकारचे मुद्रा कर्ज घेता येईल. या व्यवसायासाठी, तुम्हाला खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागेल आणि उर्वरित 75 टक्के रक्कम मुद्रा कर्ज म्हणून उपलब्ध होईल. तुम्ही देखील हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मुद्रा लोन फॉर्म भरून कर्जासाठी अर्ज करू शकता.

खर्च आणि नफा किती? 

सर्वप्रथम, तुम्हाला 50-150 जीएसएमचा पेपर रोल लागेल, जो बाजारात 30-35 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, गोंद आणि शाई आवश्यक असेल. कागदी पिशव्या बनवण्याचा तुमचा खर्च 40 रुपये प्रति किलोपर्यंत येऊ शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही ते 50 रुपये किलोने बाजारात विकले तर 10 रुपयांचा एकूण नफा होईल. एका मशीनद्वारे तुम्ही एका तासात 550 रुपये कमवू शकता, तर दिवसभरात तुम्ही 4,000 रुपये कमवू शकता. अशा प्रकारे, तुम्हाला दररोज 2 ते 2.5 हजार रुपयांचा नफा मिळेल. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 70 ते 75 हजार रुपयांचा नफा मिळू शकतो. म्हणजे एका वर्षात तुम्हाला 9 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.

Source : navbharattimes.indiatimes.com