Amazon Prime Day Sale : Amazon कंपनीने 'Amazon Prime Day Sale' ची तारीख जाहीर केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon केवळ 48 तासांसाठी सेल इव्हेंट आयोजित करणार आहे. हा सेल इव्हेंट 15 जुलै रोजी सुरू होऊन 16 जुलै रोजी संपणार आहे. Amazon च्या अधिकृत पेजवरून असे लक्षात आले आहे की, ग्राहकांना लॅपटॉप, इयरफोन आणि वॉच यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर 75 टक्यांपर्यंत सूट मिळणार आहे. मोबाइलवर 40 टक्क्यांपर्यंत आणि स्मार्ट टीव्ही आणि गृहोपयोगी उपकरणांवर 60 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर विशेष सूट मिळणार
Amazon चे प्राइम डे सेल पेजनुसार, Realme Narzo N53, OnePlus Nord CE 3 Lite 5G, OnePlus 11R 5G, iPhone 14, Redmi 12C, iQOO Z6 Lite आणि इतर स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट मिळणार आहे. परंतु, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे नेमक्या डिल आणि किमती जाहीर केलेल्या नाहीत. या प्राइम डेमध्ये ग्राहकांना इको (With Alexa), फायर टीव्ही आणि किंडल उपकरणांवर उत्तम डील मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. नवीनतम स्मार्ट स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले वर 55% पर्यंत सूट मिळू शकते.
या शहरांमध्ये एक दिवसीय डिलिव्हरी उपलब्ध असणार
सेल इव्हेंटची घोषणा करताना, कंपनीने असा दावा केला आहे की, भारतातील 25 शहरांमधून ऑर्डर करणारे प्राइम मेंबर्स त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑर्डर मिळवू शकतील. या 25 शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे या शहरात डिलिव्हरी उपलब्ध असणार आहे.
कंपनीने जाहीर केले आहे की, आगामी Amazon प्राइम डे सेलमध्ये ICICI बँक कार्ड, SBI क्रेडिट कार्डवर 10% सूट मिळेल. याशिवाय, प्राइम डे 2023 साठी, सर्व ग्राहकांना Amazon Pay ICICI बँक (ICICI) क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 10 टक्के झटपट सूट मिळणार आहे.
नॉन-प्राइम सदस्यांनाही होणार फायदा
कंपनीने दिलेल्या डिटेल्सनुसार, प्राइम सदस्य Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसाठी साइन अप करू शकतात आणि 2,500 रुपये आणि 300 रुपये कॅशबॅक इत्यादी पर्यंतचे फायदे मिळवू शकतात. नॉन-प्राइम सदस्य देखील साइन अप करू शकतात आणि 200 रुपये कॅशबॅक, 1,800 prizes आणि 3 महिने मोफत प्राइम मेंबरशिप मिळवू शकतात.
Source : financialexpress.com