Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UBS Layoffs: युरोपमधील UBS बँक 35 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार?

UBS Layoffs

Image Source : www.edition.cnn.com

UBS Bank: मंदीमुळे सुरु झालेल्या आर्थिक संकटाचा सामना युरोपातील बँकांनासुध्दा करावा लागत आहे. युरोपमधील सर्वात जुन्या बँकांपैकी एक असलेल्या क्रेडिट सुइस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी, स्विस सरकारने हस्तक्षेप करुन तिचे विलीनीकरण UBS मध्ये केले. परंतु, क्रेडिट सुइस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात UBS बँक आता स्वत: मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली असल्याचे दिसत आहे.

Europe UBS Bank Layoffs: अमेरिकेपासून सुरु झालेल्या आर्थिक मंदीचा प्रभाव आता युरोपमधील बँकांवरही दिसू लागला आहे. युरोपमधील सर्वात जुन्या बँकांपैकी एक असलेल्या क्रेडिट सुइस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी, स्विस सरकारने हस्तक्षेप करुन UBS सोबत करार केला. परंतु, क्रेडिट सुइस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात UBS बँक आता स्वत: मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली असल्याचे दिसत आहे. यामुळे UBS बँक आता 35 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.

50 टक्क्यांहून अधिक ले-ऑफ

स्विस सरकारच्या हस्तक्षेपानंतर, तिथल्या UBS या मोठ्या बँकेने संकटात सापडलेली क्रेडिट सुइस विकत घेण्याचे मान्य केले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, UBS क्रेडिट सुइसच्या 35,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली जात आहे. बँकिंग संकटामुळे अडचणीत येण्यापूर्वी क्रेडिट सुइसमध्ये सुमारे 45,000 कर्मचारी होते. 35,000 कर्मचारी कामावरुन कमी करण्याची योजना जर का UBS क्रेडिट सुइस आखत असेल, तर हा ले-ऑफ चा आकडा 50 टक्क्यांहून अधिक आहे.

काय होता करार

UBS सोबत करण्यात आलेल्या या करारासाठी स्विस सरकारने 109 अब्ज स्विस फ्रँक्स म्हणजेच 120.82 अब्ज डॉलरचे बचाव पॅकेज तयार केले होते. डील अंतर्गत, UBS ने 3.25 बिलियन डॉलर मध्ये बँक क्रेडिट सुईस विकत घेण्याचे मान्य केले. खरेतर, स्वित्झर्लंडसह अनेक देशांची सरकारे आणि बँकिंग नियामक क्रेडिट सुईसच्या संकटामुळे त्रासली होती. ती लवकर सोडवली गेली नाही, तर बँकिंगचे संकट अधिक गंभीर होऊ शकते, याची कल्पणा सरकारला होती.

तीन टप्प्यात होऊ शकते Layoffs

तथापि, जेव्हा UBS आणि क्रेडिट सुईस यांच्यात करार केला जात होता, तेव्हाच अनेक विश्लेषकांनी मोठ्या प्रमाणात ले-ऑफ ची भीती व्यक्त केली होती. आता ती भिती वास्तव्यात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु  UBS बँकेने अद्याप यावर कुठलिही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

क्रेडिट सुइस डीलनंतर यूबीएसच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1.2 लाख झाली आहे. त्यापैकी 37 हजार कर्मचारी स्वित्झर्लंडमध्ये आहेत. ब्लूमबर्गचा अहवाल म्हणतो की, UBS मधील कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात केली जाऊ शकते. पहिले Layoffs जुलैमध्ये होऊ शकते, तर दुसरे आणि तिसरे Layoffs या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची अपेक्षा आहे.