SBI Clerk Salary: स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. दरवर्षी क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती केली जाते. क्लर्क पदावर निवड झाल्यानंतर अनुभव आणि अंतर्गत परीक्षा देऊन वरिष्ठ पदापर्यंतही जाऊ शकता. 2023 पासून स्टेट बँकेने क्लर्क पदासाठीच्या पगार रचनेत बदल केला आहे. पाहूया SBI Clerk ला किती पगार मिळतो.
SBI क्लर्कला इन-हँड किती पगार मिळतो?
SBI क्लर्क म्हणून कामावर नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला हातामध्ये 26,000 रुपये ते 29,000 रुपये पगार मिळतो. पीएफ, टीडीएस आणि इतर वजावट सोडून पगार कॅलक्युलेट केला जातो. तसेच पोस्टिंग शहरी किंवा ग्रामीण भागात आहे त्यावरून इतर भत्ते आणि सुविधा ठरतात. त्यामुळे पगाराची रक्कमही बदलते.
SBI क्लर्कची बेसिक सॅलरी किती?
बेसिक सॅलरीमध्ये सुविधा आणि इतर भत्ते अॅड करून पगार मिळतो. मात्र, फक्त बेसिक सॅलरी किती ते पाहूया. 2023 मध्ये जे बदल केले आहेत त्यानुसार एसबीआय क्लर्क पदासाठी बेसिक सॅलरी 17,900 पासून पुढे सुरू होते. बढती, पदोन्नतीनुसार क्लर्क पदाचा बेसिक पगार 47,920 हजार रुपये आहे. दरवर्षी बेसिकवर पगारवाढ मिळते.
SBI क्लर्कला पगारासोबत इतर कोणत्या सुविधा मिळतात
डेअरन्स अलाउंन्स म्हणजेच DA कन्झ्युमर प्राइज इंडेक्सनुसार दिला जातो.
हाऊस रेंट अलाउंन्स (HRA) तुम्ही कोणत्या भागात पोस्टिंगला आहात त्यावर अवलंबून असते. मेट्रो शहरामध्ये घरभाडे भत्ता जास्त असतो. तर निमशहरी आणि ग्रामीण भागात हा भत्ता कमी होतो. परिणामी पगारही कमी होतो.
प्रवास भत्ता, स्पेशल अलाउंन्स, मेडिकल अलाउंन्स, न्यूजपेपर अलाउंन्स, फर्निचर अलाउंन्सही दिला जातो.
आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, पगारी सुट्ट्या अशा सुविधाही मिळतात.
SBI क्लर्क पदाचे प्रमोशन कसे होते?
SBI क्लर्क पदासाठी इन-केडर तसेच ऑफिसर केडर अशा दोन प्रकारे प्रमोशन होते. इन-केडर प्रमोशन हे ठराविक कालवधीने एकाच ठिकाणी पोस्टिंग असताना होते. दहा वर्षांच्या सेवेनंतर सिनियर क्लर्क/असिस्टिंट पदावर प्रमोशन होते. तसेच स्पेशल असिस्टिंट, सिनियर स्पेशल असिस्टंट असे प्रमोशन पुढील सेवाकाळात होते. प्रमोशन होतेवेळी स्पेशल अलाउंन्सही पगारासोबत दिला जातो.
ऑफिस केडर प्रमोशन
ऑफिसर केडरवर प्रमोशन होण्यासाठी Indian Institute of Banking and Finance (IIBF) संस्थेच्या JAIIB आणि CAIIB या परीक्षा द्याव्या लागतात. त्यासोबतच बँकेची अंतर्गत परीक्षा आणि मुलाखतही पास व्हावी लागते. निवड झाल्यानंतर द्वितीय श्रेणी पदावर दोन वर्ष प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर नेमणूक होते. द्वितीय श्रेणीवरून प्रथम श्रेणी अधिकारी होण्यासाठीही IIBF संस्थेच्या परीक्षा द्याव्या लागतात.