Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Air Conditionar Sale: काय म्हणता, Samsung एअर कंडीशनरवर मिळतेय 50% सूट! जाणून घ्या ऑफर

सॅमसंगच्या स्प्लिट एसी वर सध्या एक धमाकेदार ऑफर दिली जात आहे. तुम्हाला देखील 50 % सवलतीत स्प्लिट एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टची ही ऑफर जाणून घेतली पाहिजे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर एसी खरेदीवर खास सवलती दिल्या जात आहेत तसेच बँक ऑफर्सचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: लाडूविक्रीसह विविध योजना अन् उपक्रमांतून पंढरपूर देवस्थान देतं भाविकांना सुविधा

Pandharpur Wari 2023: पंढरपुरात पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान लाडूंच्या विक्रीसह विविध योजनादेखील राबवत असते. याचा देवस्थानासह सर्वांनाच लाभ मिळतो. काही योजनांमध्ये नाममात्र गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

Read More

RBI on Inflation: महागाईमुळे सामन्यांच्या खरेदी क्षमतेत घट, उद्योगधंद्यांवर जाणवतो आहे परिणाम

महागाईच्या उच्च दरामुळे, सामान्य नागरिकांच्या खाजगी वापरावरील खर्चात घट झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांनाच्या उद्योगधंद्यावर देखील थेट परिणाम पहायला मिळतो आहे. सध्या सर्विस सेक्टरमधील कंपन्या धीम्या गतीने वाटचाल करत असून सामान्य नागरिक काटकसरीने पैसे खर्च करत आहेत. यामुळे कंपन्यांचा विस्तार मंदावला असून खाजगी गुंतवणूक कमी होत आहे. आरबीआयने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

Read More

QR Code: छोट्यातल्या छोट्या पॅकेटवरही मिळणार प्रॉडक्टची पूर्ण माहिती, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरच्या क्यूआर कोडची कमाल

QR Code: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी... आता एखाद्या छोट्यातल्या छोट्या पॅकेटवरच्या क्यूआर कोडवरून संबंधित उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. आता पॅकिंगवर सर्वकाही लिहिणंही शक्य होईल, मात्र ही माहिती क्यूआर कोडद्वारे मिळणार आहे.

Read More

Amazon Investment in India: ग्लोबल जायंट अ‍ॅमेझॉन भारतात 15 बिलियन डॉलर गुंतवणार

अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉन भारतामध्ये तब्बल 15 बिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहेत. इ-कॉमर्स, रिटेल, डेटा/क्लाऊड सेंटर्स, वाहतुकीसह इतर अनेक क्षेत्रात अ‍ॅमेझॉनने भारतात पाय रोवले आहेत. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅमेझॉनने एअर कार्गो सुविधा भारतात सुरू केली आहे.

Read More

Lemon Grass Farming : लेमन ग्रासच्या शेतीमध्ये 20 हजार रुपये गुंतवून मिळवू शकता, लाख रुपयांपर्यंतचा नफा

Lemon Grass Farming : लेमन ग्रासच्या लागवडीमुळे लवकरात लवकर उत्पन्न मिळते. लेमन ग्रास तेलाला मोठी मागणी आहे. एका वर्षात 4 लाख रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. जाणून घ्या, लागवड खर्च किती येत असेल?

Read More

Ganapati Festival 2023: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेकडून 156 'गणपती स्पेशल ट्रेन'

Konkan Railway Ganpati Booking 2023: गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे 156 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवणार आहे.

Read More

Byju’s Crisis: कोरोना काळात घराघरात पोहचलेली बायजू आर्थिक संकटात; गुंतवणुकदारांनीही साथ सोडली

सध्या बायजूवर 1.2 बिलियन डॉलरचे टर्म लोन आहे. मात्र, हे कर्ज फेडण्याची कंपनीची क्षमता नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जदारांनी बायजूविरोधात खटला दाखल केला आहे. दरम्यान, बायजूनेही कर्जदारांच्या अटी अवास्तव असल्याचे म्हणत उलट गुन्हा दाखल केला आहे. संचालक मंडळातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींनी काल (शुक्रवार) राजीनामा दिला.

Read More

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगल 'या' राज्यात उभारणार ग्लोबल फिनटेक सेंटर; 10 बिलिअन डॉलरची करणार गुंतवणूक

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट घेऊन भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.

Read More

Electricity tariff : दिवसा स्वस्त, रात्री महाग होणार वीज दर; शेतकऱ्यांना दिलासा

केंद्रीय उर्जा मंत्रालयाने वीज दराच्या नियमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना दिवसा वीज वापरल्यास कमी बिल आकारले जाईल. तसेच रात्रीच्यावेळी जेवढी वीज वापरली जाणार आहे. त्या विजेच्या दरामध्ये वाढ केली जाणार आहे. दिवसा वापरण्यात येणाऱ्या वीजचा दर हा 20% स्वस्त तर रात्रीचा वीज दर हा 20% महाग असणार आहे.

Read More

Finology India Survey: 75 टक्के भारतीयांकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणताही फंड नाही; सर्वेक्षणातून माहिती उघड

Finology India Survey: पर्सनल फायनान्स प्लॅटफॉर्म 'फिनोलॉजी इंडिया'ने (Finology India) भारतीय लोकांच्या आर्थिक नियोजनाबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. नेमकं काय म्हटलं आहे या सर्वेक्षणात, जाणून घेऊयात.

Read More

Apple Card: एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने अ‍ॅपल लवकरच क्रेडिट कार्ड लाँच करणार

HDFC Bank आणि भारतीय नियामक संस्थांशी अ‍ॅपलची बोलणी सुरू असून येत्या काळात ग्राहकांना 'अ‍ॅपल कार्ड' दिसू शकेल. दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे दोन स्टोअर सुरू करून अ‍ॅपलने भारतातील उद्योग वाढीच्या अध्यायाला सुरुवात केली आहे. आता अ‍ॅपल कंपनी HDFC बँकेच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड आणण्याच्या तयारीत आहे.

Read More