PAN Card : आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. सरकारनेही तारीख वाढवली नाही. प्राप्तिकर विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आधारशी लिंक नसलेली सर्व पॅन कार्ड 1 जुलैपासून निष्क्रिय करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना त्यांचा पॅन आणि आधार लिंक करता आलेला नाही आणि त्यांचा पॅन निष्क्रिय झाला आहे, त्यांनी टेन्शन घेऊ नका. कारण पॅन कार्ड सक्रिय करण्याचा मार्ग अजूनही बाकी आहे.
यापूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 28 मार्च 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती, ज्यात पॅन कार्ड पुन्हा ॲक्टिव करण्याच्या स्टेपची माहिती दिली होती. पॅनकार्ड पुन्हा ॲक्टिव करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला सांगून 1000 रुपये शुल्क भरावे लागेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. पुन्हा सक्रिय होण्यास 30 दिवस लागतात.
पॅन ॲक्टिव आहे की नाही हे कसे चेक करायचे?
- इन्कम टॅक्स फाइलिंग पोर्टलवर जा.
- येथील क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जाऊन “Verify Your PAN” सेवेवर जा.
- आता “Verify Your PAN” पेजवर तुमचा पॅन क्रमांक, पूर्ण नाव आणि जन्मतारीख मोबाइल नंबर ॲड करा.
- "सुरू ठेवा" वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर 6 अंकी वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.
- ते अॅड करा. तुम्हाला योग्य पासवर्ड टाकण्यासाठी फक्त 3 संधी मिळतील.
- पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास, तुम्ही स्क्रीनवर पॅन स्थिती पाहू शकता.
- अॅक्टिव पॅन असे दाखवल्यास तुमचे पॅन कार्ड सक्रिय झाले आहे.
बंद केलेले पॅन पुन्हा कसे सक्रिय करावे?
अधिसूचनेनुसार, जे पॅन आधारशी लिंक करू शकले नाहीत त्यांना त्यांचा पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल. याशिवाय या प्रक्रियेला 30 दिवस लागतील. यानंतर पॅन कार्ड पुन्हा सक्रिय होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही 6 जुलै रोजी पॅन कार्ड सक्रिय करण्याची प्रक्रिया सुरू केली तर तुमचे पॅन कार्ड 6 ऑगस्ट रोजी सक्रिय होईल.
- इन्कम टॅक्स पोर्टलवर जा आणि 'ई-पे टॅक्स' वर जा.
- तुमचे पॅन डिटेल्स एंटर करा.
- CHALLAN NO./ITNS 280 वर जा.
- येथे तुम्हाला फी भरावी लागेल.
- पेमेंट मोड निवडा.
- पॅन प्रविष्ट करा, मूल्यांकन वर्ष निवडा आणि पत्ता ॲड करा.
- कॅप्चा कोड आणि Proceed टॅबवर क्लिक करा.