Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जानेवारी ते जून मध्ये देशातील 7.60 कोटी नागरिकांनी केला हवाई प्रवास, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील आकडा सगळ्यात जास्त

Summer Holiday Air Traveling Number

Image Source : www.outlookindia.com

Summer Holiday Air Traveling Number: उन्हाळ्याच्या सुट्टीत विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर जानेवारी ते जून कालावधीत देशातील 7.60 कोटी नागरिकांनी हवाई प्रवास केला असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीवरुन सिध्द झाले आहे.

June Aviation Data: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रासाठी खूप चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. जून महिन्यात प्रवाशांनी देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवास केला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) आकडेवारीनुसार, जूनमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 18.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कारण जून 2023 मध्ये, 1.24 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रवास केला आहे. परंतु, जून महिन्यात मे महिन्याच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, ही घट 5.5 टक्के एवढी आहे.

कोरोना नंतर प्रवाश्यांच्या संख्येत वाढ

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) आकडेवारीनुसार, मे 2023 मध्ये एकूण 1.32 कोटी लोकांनी देशांतर्गत विमानाने प्रवास केला. अशा स्थितीत जूनमध्ये महिन्या-दर-महिना 5.5 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. तर कोरोना कालावधीपूर्वी या मे ते जून महिन्याच्या काळात 1.20 कोटी लोकांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला होता.

सहा महिन्यांत 7.60 कोटींचा आकडा

जानेवारी ते जून दरम्यान देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत 7.60 कोटी लोकांनी हवाई प्रवास केला आहे. तर गेल्या वर्षी या कालावधीत एकूण 5.72 कोटी लोकांनी प्रवास केला होता. अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या सहा महिन्यांत विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत 32.92 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.

कोणत्या कंपनीची किती वाढ

मे महिन्यात GoFirst संकट सुरू झाल्यापासून, देशांतर्गत बाजारात इंडिगोचा वाटा वाढत आहे. इंडिगो एअरलाइन्सचा बाजार हिस्सा जूनमध्ये 63.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जून महिन्यात एकूण 78.93 लाख प्रवाशांनी इंडिगोची सेवा घेतली आहे. त्याचवेळी देशांतर्गत बाजारपेठेत एअर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीचा देशांतर्गत बाजारातील हिस्सा 9.7 टक्के आहे. त्याचवेळी, टाटाच्या विस्तारामधील भागभांडवल जूनमध्ये 0.9 टक्क्यांनी कमी होऊन ते 8.1 टक्क्यांवर पोहोचले आहे. स्पाईसजेटला मागे टाकून जूनमध्ये अकासा एकरने देशांतर्गत बाजारपेठेतील 4.9 टक्के हिस्सा काबीज केला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.