Navi Technologies: फिनटेक स्टार्टअप नावी (Navi Technologies layoff) कंपनीने 200 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा पुढील काही दिवसांत आयपीओ येणार आहे. मात्र, त्याआधीच खर्च कमी करण्यासाठी कंपनीने नोकरकपातीचे हत्यार उगारले आहे. कंपनीवर कर्जाचा बोजा वाढल्याने कर्मचारी कपात केल्याचेही बोलले जात आहे.
फ्लिपकार्ट कंपनीने मालक सचिन बन्सल हे नावी कंपनीचे संस्थापक आहेत. प्रॉडक्ट, अॅनलिटिक्स आणि टेक्नॉलॉजी विभागातील सर्वाधिक सर्वाधिक जॉब जाणार आहेत. कंपनीकडून सूक्ष्म कर्जपुरवठाही केला जातो. (Navi Technologies layoff) या विभागातील कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी व्यवस्थापनासोबत चांगले संबंध नसल्याने राजीनामे दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
IPO द्वारे 3,350 कोटी रुपये उभारणार
नावी कंपनी भांडवली बाजारातून 3350 कोटी रुपये उभारणार आहे. सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतरही कंपनी आयपीओ आणण्यास उशीर करत आहे. जागतिक बाजारातील अस्थिर परिस्थितीमुळे कंपनीने बाजारातून पैसे उभारण्याचे नियोजन पुढे ढकलल्याचे समजते. (Navi Technologies layoff) नावी टेक्नॉलॉजी कंपनीची 97% मालकी सचिन बन्सल यांच्याकडे आहे. 2018 साली त्यांनी या कंपनीची स्थापना केली.
नावी कंपनीमध्ये सुमारे साडेचार हजार कर्मचारी आहेत. यापैकी 20% कर्मचारी कपात कंपनी करणार आहे. मागील काही आठवड्यांपासून कंपनीने कर्मचारी कपात सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बुडीत कर्जमुळे तोटा
मागील वर्षी नावी कंपनीने 140 कोटींचे कर्ज आपल्या बुक ऑफ अकाउंटमधून हटवले. म्हणजेच कंपनीने दिलेले कर्ज बुडीत निघाले. यामुळेही नावी कंपनीचा तोटा वाढला. कर्ज बुडीत निघणे हा भारतीय बँकांपुढील गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे अनेक बँका यापूर्वीही अडचणीत आल्या होत्या.