Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance-Future group: दिवाळखोर बिग बझारसह फ्यूचर ग्रुप रिलायन्सच्या ताब्यात? लवकरच सुरू होणार नवा ब्रँड

Reliance-Future group: दिवाळखोर बिग बझारसह फ्यूचर ग्रुप रिलायन्सच्या ताब्यात? लवकरच सुरू होणार नवा ब्रँड

Reliance-Future group: फ्यूचर ग्रुपचा ब्रँड बिग बझार सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे. आता हा बँड लवकरच रिलायन्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला (RRVL) फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडचा (FEL) संभाव्य खरेदीदार मानलं जात आहे.

बिग बझार (Big Bazaar) सध्या कॉर्पोरेट इन्सोल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेसमध्ये (Corporate insolvency resolution process) आहे. एफईएल ही फ्यूचर ग्रुप कंपनी आहे जी देशभरात बिग बझार या ब्रँड नावानं किरकोळ व्यवसाय चालवते. एफईएलच्या रिझोल्यूशन व्यावसायिकानं तीन संभाव्य रिझोल्यूशन अर्जदारांची (PRAs) एक प्रारंभिक यादी अंतिम केली आहे. या यादीमध्ये आरआरव्हीएल (Reliance retail venture limited) व्यतिरिक्त पोलाद कंपनी जिंदल (इंडिया), पॉलिस्टर व्हिस्कोस आणि फॅब्रिक निर्माता जीबीटीएल (GBTL) यांचाही समावेश आहे. या निवडक कंपन्यांनी 24 ऑगस्ट 2023पर्यंत त्यांचे रिझोल्यूशन प्लॅन सबमिट करणं गरजेचं आहे.

उपायांचा नियमित विकास

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणनं (National Company Law Tribunal) मार्च 2023 मध्ये एफईएलसाठी कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजनं एक मोठा करार रद्द केल्यावर हे घडलं. यामुळे 19 कंपन्या रिलायन्स रिटेलकडे हस्तांतरित केल्या जाणार होत्या. सध्या फ्युचर ग्रुपच्या जवळपास 4 कंपन्यांवर दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. यात कंपन्या फ्यूचर एंटरप्राइजेस, फ्यूचर रिटेल लिमिटेड, फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन लिमिटेड आणि फ्यूचर सप्लाय चेन लिमिटेड यांचा समावेश आहे.

विविध स्त्रोतांकडून दावे

एफईएल किरकोळ, घाऊक, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या 19 समूह कंपन्यांचा भाग आहे. या कंपन्या ऑगस्ट 2020मध्ये घोषित केलेल्या 24,713 कोटी रुपयांच्या करारानुसार रिलायन्स रिटेलला हस्तांतरित केल्या जाणार होत्या. दरम्यान, रिझोल्यूशन प्रोफेशनलला विविध स्त्रोतांकडून एकूण 15,819.92 कोटी रुपयांचे दावे प्राप्त झाले आहेत. एफईएलच्या कर्मचाऱ्यांकडूनही काही दावे प्राप्त झाले आहेत.

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले

फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेड दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. 2008मध्ये 4 जानेवारी रोजी, फ्यूचर एंटरप्रायझेसचे शेअर्स 66 रुपयांपेक्षा जास्त किंमतीनं व्यवहार करत होते. नंतर फ्यूचर एंटरप्रायझेसच्या समभागांमध्ये सतत घसरण झाली. घसरणीसह या समभागांनी एक रुपयाच्या खाली पातळी गाठली आहे.