Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI France: भारताची UPI पेमेंट सिस्टिम फ्रान्स स्वीकारणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

UPI Payments

भारतीय UPI (Unified payment system) पेमेंट जगभरात नावाजलेले आहे. जलद, सुरक्षित आणि सुलभ पेमेंट असल्यामुळे सिंगापूरसह काही देशांनी ही सिस्टिम स्वीकारली आहे. आता फ्रान्स देखील युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत UPI France लाँच होऊ शकते.

UPI France: सिंगापूर नंतर भारताची UPI पेमेंट सिस्टिम फ्रान्स देखील स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी UPI पेमेंट सिस्टिम बाबात घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. सोबतच फ्रान्सकडून 26 राफेल विमानं आणि स्कॉर्पियन श्रेणीतील 3 पाणबुड्या घेण्याच्या करारावरही सह्या होणार आहेत.

भारतीय UPI प्रणालीचं जगभरात कौतुक 

भारतीय UPI (Unified payment system) पेमेंट प्रणाली जगभरात नावाजली आहे. सर्वाधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ पेमेंट सिस्टिमचं जाळं उभारल्याबद्दल भारताचं जगभरात कौतुक होत आहे. देशात डिजिटल पेमेंटची सवय रुजवण्यास युपीआय ने महत्त्वाची कामगिरी बजावली. आता भारतीय युपीआय पेमेंट सिस्टिम युरोपतही जाण्याची चिन्हे आहेत. फ्रान्स ही प्रणाली स्वीकारणार असल्याचे वृत्त आघाडीच्या सर्व माध्यमांमध्ये आले आहे.

मोदींच्या उपस्थितीत UPI पेमेंट प्रणाली लाँच करणार

अशीही माहिती मिळत आहे की, युपीआय पेमेंट सिस्टिमचे अनावरण मोदींच्या उपस्थितीत फ्रान्समध्ये होणार आहे. संयुक्त अरब अमिरात, भूतान, नेपाळने आधीच भारतीय पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. UPI सिस्टिम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) अंतर्गत येते. अमेरिका, युरोप, पश्चिम आशियाई देशांमध्ये ही प्रणाली लागू करण्यासाठी NPCI प्रयत्नशील आहे. 

73 टक्के ऑनलाइन व्यवहार UPI द्वारे 

भारतामध्ये ज्या प्रकारे ऑनलाइन पेमेंट सिस्टिम यशस्वी झाली. तशी इतर कोणत्याही देशात झाली नाही. सर्वात प्रगत अमेरिका आणि युरोपीयन देशही भारतासारखी ऑनलाइन पेमेंट सिस्टिम उभारण्यात यशस्वी झाले नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्षात युपीआयद्वारे 139 ट्रिलियनचे व्यवहार झाले. कॅश सोडून इतर ऑनलाइन व्यवहारात UPI चे प्रमाण 73 टक्के आहे. 

दोन्ही देशांची पेमेंट सिस्टिम एकत्र येणार? 

फ्रान्समध्ये Lyra ही पेमेंट प्रणाली आहे. जर भारतीय UPI फ्रान्समध्ये सुरू झाले तर या दोन्ही पेमेंट सिस्टिम एकमेकांना जोडण्यात येतील. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांना पैसे पाठवणे सुलभ होईल. सिंगापूर आणि भारतामध्ये तशी व्यवस्था उपलब्ध आहे. भविष्यात इतर अनेक देशांमध्ये UPI सुरू होण्याची शक्यता आहे. 2022 साली UPI संबंधीत फ्रान्स आणि भारतामध्ये करार झाला होता. UPI सोबत रुपे कार्डलाही परवानगी मिळू शकते.