जर तुम्ही ट्विटर युजर्स असाल आणि तुमचे बरेचशे फॉलोअर्स असतील तर तुम्हांला आता ट्विटरवरून पैसे कमवता येणार आहे. होय, युट्युब, फेसबुक प्रमाणेच आता ट्विटर युजर्सला पैसे कमावण्याची संधी दिली जात आहे. याबाबत ट्विटरने एक योजना बनवली असून, तू आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याद्वारे जाहिरातीतून युजर्सला महसूल कमवता येईल. तसे पाहायला गेले तर गेल्या काही दिवसांपासून ट्विटरने वेगवेगळे नियम लादून युजर्सची नाराजी ओढावून घेतली होती. त्यांनतर युजर्सला महसूल कमवण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर युजर्स संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
Surprise! Today we launched our Creator Ads Revenue Sharing program.
— Twitter (@Twitter) July 13, 2023
We’re expanding our creator monetization offering to include ads revenue sharing for creators. This means that creators can get a share in ad revenue, starting in the replies to their posts. This is part of our…
ट्विटरने त्याच्या अधिकृत खात्यावरून या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. परंतु ट्विटरची एकूण कार्यपद्धती बघता त्यांचे महसुलाच्या बाबतीतले नियम कठीण असतील असे मानले जात आहे. याबाबतचा खुलासा जेव्हा ट्विटर डिटेल नियामवली जाहीर करेल तेव्हाच होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाची जरी घोषणा झाली असली तरी ट्विटरच्या नियमावलीची युजर्सला प्रतीक्षा आहे. ट्विटरने लिहिले आहे की,
“सरप्राईस! आज आम्ही आमच्या क्रिएटर्ससाठी जाहिरात महसूल शेअरिंग कार्यक्रम लाँच केला. ट्विटर क्रिएटर्ससोबत आम्ही महसूल शेयर करणार आहोत, यामुळे युजर्सला आता जाहिरातीचा वाटा मिळू शकेल. ट्विटर युजर्सला थेट कमाईचा पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत. या महिनाअखेरीस या जाहिरात महसूल शेअरिंग कार्यक्रमाचे डीटेल्स शेयर केले जातील आणि त्यांनतर पात्र युजर्स या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकणार आहे.”
एलन मस्क यांनी आधीच दिली होती कल्पना
ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत ट्विटर युजर्सला कल्पना दिली होती. पेड व्हेरिफिकेशन (Paid Verification) असलेल्या खातेदारांना ट्विटरतर्फे अधिकाधिक सुविधा देण्यात येईल असे ते म्हणाले होते. युजर्सला आम्ही पैसे कमावण्याची संधी देऊ असे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनतर ही घोषणा केली गेली आहे.