महानगर गॅस लिमिटेड अर्थात MGL ने मुंबई आणि मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक भन्नाट ऑफर आणलीये. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मध्ये नवीन रेट्रोफिटेड CNG कार आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी ही डील सादर करण्यात आली आहे.
या ऑफरमध्ये सीएनजीचा वापर करून गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना मोफत सीएनजी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात यावर अटी आणि नियम लागू आहेत. MGL च्या निवेदनानुसार MGL free fuel card योजनेत वाहन चालकांना 20 हजार ते 5 लाखांपर्यंत किमतीचा सीएनजी भरता येणार आहे. खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही वाहनांना या योजेनेचा लाभ मिळणार आहे.
योजना कशासासाठी?
गेल्या एकाही वर्षांपासून हरित ऊर्जेवर केंद्र सरकारकडून जोर दिला जात आहे. 2070 पर्यंत भारताला कार्बन इमिशन फ्री देश करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicle) खरेदीवर सरकारकडून नागरिकांना सबसिडी देखील जात आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, चेन्नई, मद्रास, दिल्ली अशा मोठमोठ्या शहरांत देखील सीएनजीची सवय नागरिकांना लागावी आणि पेट्रोल डीझेलवरचे अवलंबित्व कमी व्हावे असा सरकारचा विचार आहे.
काय आहे योजना?
MGL चे व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल (Ashu Shinghal) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार MGL CNG Festival सुरु करण्यात आलाय. या योजनेअंतर्गत मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नवीन CNG वाहन खरेदीदारांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
नागरिकांना पेट्रोल-डीझेलला पसंती देऊ नये आणि कमी खर्चात वाहन चालवण्यासाठी सीएनजीला पसंती द्यावी यासाठी त्यांना MGL कडून कार्ड दिले जाणार आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांना देखील हे कार्ड प्रदान केले जाणार आहे. लहान वाहने 3.5 टनपर्यंत, मध्यम वाहने 10 टनपर्यंत तर मोठी व्यावसायिक वाहने 15 टनपर्यंत मोफत सीएनजी भरू शकणार आहेत.
किती रुपयांचे असेल कार्ड?
हे कार्ड ग्राहकांना मोफत दिले जाणार असून, केवळ नवीन खरेदी केलेल्या गाड्यांनाच याचा फायदा दिला जाणार आहे. लहान गाड्यांना 19,999 रुपये, मध्यम गाड्यांना 200,000 रुपये तर मोठ्या गाड्यांना 350,000 ते 500,000 रुपये किमतीचा सीएनजी भरता येणार नाही.