YouTube ही युजर जनरेटेड कंटेट (User Generated Content) बनवणारी आणि ती प्रसारित करणारी एक सोशल मिडिया कंपनी आहे. युट्युबवर वेगवगळ्या विषयांवर व्हिडियो बनवून अनेक कंटेट क्रियेटर आज लाखो रुपये कमवत आहेत. तसेच जगभरात याचे युजर्स असून महसुलातून युट्युब देखील अब्जो रुपये कमवत आहेत.
मागच्या वर्षी युट्युबने TikTok आणि Instagram Reels ला पर्याय देण्यासाठी YouTube Shorts ची सुविधा सुरु केली होती. यात युजर्स छोटे-छोटे व्हिडियो बनवू शकतात. मात्र आता युट्युबचे हेच फीचर्स त्यांचा मुख्य व्यवसाय असलेले लाँग-फॉर्म व्हिडिओ व्यवसाय अडचणीत आणताना दिसत आहे.
काय आहे प्रकरण?
द फायनान्शिअल टाइम्सच्या बातमीनुसार, युट्युबच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार युट्युबचे लाँग-फॉर्म व्हिडिओ आता पहिल्यासारखे चालताना दिसत नाहीये. आता युजर्स त्यांच्या अधिकाधिक वेळ हा YouTube Shorts वर खर्च करत आहेत. त्यामुळे युट्युबची खरी ओळख असलेले लाँग-फॉर्म व्हिडिओ कमी प्रमाणात बनत आहेत. कंटेट क्रियेटर देखील यावरच लक्ष केंद्रित करत आहेत.
2 अब्जाहून अधिक मासिक लॉग-इन
YouTube Shorts ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. Google ने अलीकडेच जाहीर केलेल्या माहितीनुसार Shorts चे आता 2 अब्जाहून अधिक मासिक लॉग-इन वापरकर्ते आहेत. YouTube Shorts ची वाढती लोकप्रियता लॉंग फॉर्म व्हिडीयोजला मारक ठरते आहे. सर्वाधिक महसूल हा याच व्हिडीयोजच्या माध्यमातून कंपनीला मिळत असतो. मात्र युजर्सचा कल हा शॉर्ट व्हिडीयोजकडे अधिक असल्याने जाहिरातदारांचा ओघ देखील अशाच व्हिडीयोजकडे अधिक आहे.
7.67 अब्ज डॉलर्सची कमाई
आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीतील निकालांमध्ये, Google ने त्यांच्या महसुलाची माहिती दिली होती. त्यानुसार YouTube ने जाहिरातीतून 7.67 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. गुगलच्या माहितीनुसार वार्षिक कमाईत 4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गुगलच्याच माहितीनुसार शॉर्ट व्हिडीयोजला जाहिरातदार अधिक पंसती देत असून येणाऱ्या काळात हे महसुलाचे मुख्य माध्यम ठरू शकते.