Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% टक्क्यांनी वाढणार?

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% टक्क्यांनी वाढणार?

Image Source : www.indiatvnews.com/www.businessleague.in

सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत आहे. आता केंद्र सरकारकडून आणखी 3 टक्क्यांनी त्यामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 45 टक्के होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना याचा फायदा जुलै 2023 पासून मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा वाढ केली जाते. जुलै महिन्यात महागाईच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून त्या बाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, आता सप्टेबरच्या तिसऱ्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या महामाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान जुलै महिन्यात महागाई दराच्या निर्देशाकांत वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अर्थमंत्रलयाकडून 3 % चा विचार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा आढावा घेऊन भत्त्यामध्ये वाढ केली जाते. मात्र, केंद्र सरकारकडून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना केवळ महागाई भत्त्यामध्ये केवळ 3 टक्के वाढ मिळू शकते असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. याबत इंडिया डॉट कॉमने विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे.

45% होणार एकूण भत्ता

सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत आहे. आता केंद्र सरकारकडून आणखी 3 टक्क्यांनी त्यामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 45 टक्के होणार आहे.  महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना याचा फायदा जुलै 2023 पासून मिळणार आहे.  महागाईच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या महागाई दराच्या तुलनेत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये निश्चित किती टक्के वाढ करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुढील वर्षात 50% होईल महागाई भत्ता-

सध्य स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता मिळत आहे. आता जुलैच्या सहामाहीच्या भत्त्यात वाढ झाल्यानंतर तो 45 % वर पोहोचेल. त्यानंतर 2024 च्या जुलैपर्यंत महागाई भत्ता 50 टक्क होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही वेतन आयोग्याच्या शिफारशी नुसार सलग 3 वेतन आयोगात जर महागाई भत्ता 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाला तर वेतनाची फेररचना करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा आठव्या वेतन आयोगा बाबत कर्मचारी संघटनाकडून विचारणा केली जाऊ शकते. मात्र, मागील अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने सध्या वेतन आयोगावर विचार करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.