Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bournvita Controversy: बोर्नविटा मुलांच्या आरोग्यास हानिकारक आहे का? इन्फ्लूएनसरच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

एका इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसरने बोर्नविटावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला. बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून हे ड्रिंक आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता. सोशल मीडियावर 1 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी हा व्हिडिओ पाहिला. सेलिब्रिटिंनी सुद्धा हा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला. मात्र, कॅटबरी कंपनीने या इन्फ्लूएनसरला कायदेशीर नोटीस धाडली. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Read More

Rishi Sunak Probe: पत्नीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आले अडचणीत? 'या' प्रकरणाची चौकशी होणार

पत्नीचे आर्थिक हितसंबंध जपल्याचा आरोप ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर झाला आहे. या प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी होणार आहे. जर सुनक दोषी आढळले तर ब्रिटनच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होऊ शकते. 2022 च्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान लिझ ट्रुस यांनी अवघ्या सहा आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा ऋषी सुनक चर्चेत आले आहेत.

Read More

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. अमेरिकन डॉलर मजबूत स्थितीत गेलाय. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह मे महिन्यात व्याजदरात वाढ करणार आहे. या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार मात्र चिंतेत आहेत. त्यामुळे डॉलर मात्र मजबूत झालाय.

Read More

TCS Salary Hike: टीसीएस आपल्या मोजक्या कर्मचाऱ्यांनाच का देणार पगारवाढ?

TCS Employment : सध्या आयटी क्षेत्रात सगळीकडे मंदीचे वारे वाहत आहे. अश्यातच टीसीएस (Tata Consultancy Services) मधील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. TCS ही देशातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी आहे. आणि आता ही कंपनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 ते 15 टक्के वेतनवाढ देणार आहे. सोबतच कंपनी कॅम्पस रिक्रूटमेंटसाठी देखील मोठे पाऊल उचलणार आहे.

Read More

India First Apple Store Mumbai : मुंबईतलं पहिलं ॲपल स्टोअर दिसायला कसं आहे?

India First Apple Store Mumbai : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आज सकाळी 11 वाजता Apple चे सीइओ टीम कूक यांच्या हस्ते ॲपल स्टोअरचं उद्घाटन झाले. तर दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला ॲपलचे स्वत:चे रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. हे स्टोअर्स आतुन-बाहेरुन कसे दिसत असेल? हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुक्ता आहे. चला तर मग जाणून घेऊया या ॲपल स्टोअर्स बाबत अधिक माहिती.

Read More

Apple Store India : एकीकडे ॲपल स्टोर सुरू होत असताना ॲपल प्रोडक्ट्सची विक्रीही वाढली

Apple Store India : आज मुंबईतील BKC इथं आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेतमध्ये ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यासाठी काल टिम कुक भारतात दाखल झाले. तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतात ॲपलची विक्री वाढण्यातही झालेला दिसून येत आहे.

Read More

Tim Cook India Visit : Apple CEO टीम कुक मुकेश अंबानी, एन. चंद्रशेखरन यांच्या भेटीला, आज मुंबई स्टोअरचं ओपनिंग

Apple CEO टीम कुक यांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची अँटिलिया निवासस्थानी भेट घेतली. (Tim cook India visit) तसेच टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखन यांनाही टीम कूक भेटले. आज (मंगळवार) मुंबईतील बीकेसी येथे ॲपलच्या पहिल्या स्टोअरचे अनावरण होणार आहे. अॅपलचे हे भारतातील पहिले स्वत:च्या मालकीचे स्टोअर असणार आहे.

Read More

High FD Rates: एफडी करण्याचा विचार करताय? 'या' बँका एफडीवर देतायेत 9.50 टक्के व्याजदर

High FD Rates: रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. बहुतांश खासगी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदर हे चक्क 9.50% द्यायला सुरुवात केलीये. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

Read More

RBI Fraud Alert: 'RBI'च्या नावे लॉटरी लागल्याचा मेल किंवा कॉल आलाय? वेळीच सावध व्हा नाही तर पश्चाताप करावा लागेल

RBI Fraud Alert: RBI या संस्थेचे मुख्य काम देशातील आर्थिक धोरणे ठरवणे, चलन पुरवठा करणे, बँकांना याबाबत मार्गदर्शन करणे हे आहे. लॉटरी किंवा बक्षीस देण्याचे काम नाही रिजर्व बँकेचे नाही! त्यामुळे लॉटरी विषयी जर कुणी तुम्हांला कॉल किंवा मेल केला असेल तर वेळीच सावध व्हा.

Read More

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

Read More

बीएसएनएलकडून व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन लॉन्च; 5 वेगवेगळ्या प्लॅनमध्ये नक्की काय मिळतंय, जाणून घ्या

BSNL Validity Extension Plan: बीएसएनएल कंपनीकडून 5 वेगवेगळे व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन लॉन्च. या प्लॅनमधून ग्राहकांना दिली जात आहे; कॉलिंगसह इंटरनेटची सुविधा.

Read More

Money deducted from account : तुमच्या बँक खात्यातून 436 रुपये वजा होतायत? काय कराल? जाणून घ्या...

PMJJBY deduction : विमा सुरू असताना किंवा संपल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात का? होत असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. त्याचा वापर करून ही वजा होणारी रक्कम तु्म्ही वाचवू शकता. विविध विमा योजना आणि त्यामाध्यमातून दर महिन्याला किंवा तिमाही हप्ता म्हणून आपल्या खात्यातून प्रिमियमसाठी ही रक्कम वजा होत असते.

Read More