TCS Employee Increment : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या (Tata Consultancy Services) लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 ते 15 टक्के पगारवाढ देण्याची शक्यता आहे. टाटा समूहाच्या या कंपनीला आशा आहे की, असे केल्याने नोकऱ्या सोडणाऱ्या किंवा बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल.
इतर कंपन्यांवरही वाढणार दबाव
टीसीएस (TCS) कंपनीतील एट्रिशन रेट (Attrition rate) 20 टक्के आहे, जो या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 13 ते 14 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. तसेच, कंपनी कॅम्पस रिक्रूटसाठी मूळ वेतन वाढविण्याचा विचार करत आहे. टीसीएसने असे केल्यास आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांवर देखील असे धोरण लागू करण्यास दबाव येऊ शकतो.
याआधीही दिली पगारवाढ आणि बोनस
IT क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु तरीदेखील TCS ने गेल्या आर्थिक वर्षात 44,000 कॅम्पस भर्ती केल्या आहेत. या वर्षी कॅम्पसमधून 40,000 लोकांना भरती करण्याची कंपनीची योजना आहे. तसेच कंपनी चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 ते 15 टक्के पगारवाढ आणि इतर कर्मचाऱ्यांना 1.5 ते 8 टक्के पगारवाढ देण्याच्या तयारीत आहे. गेल्या आर्थिक वर्षात देखील कंपनीने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस दिला होता. तर, जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत कनिष्ट अधिकाऱ्यांना 100 टक्के बोनस कंपनीने देऊ केला होता. तर आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 821 नवीन कर्मचाऱ्यांची भर्ती केली असल्याची माहिती TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिली.
किती देशांमध्ये आहे TCS
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील सर्वात मोठी सल्लागार आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. आशियातील टॉप आयटी कंपण्यांमध्ये TCS आहे. भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह टाटा समूह आहे. यामध्ये उत्पादन, रसायने, अभियांत्रिकी आणि साहित्य उद्योग तसेच ऊर्जा, दूरसंचार आणि वित्तीय सेवा यांचा समावेश आहे. या संस्थेचे मुख्यालयही मुंबईत आहे. त्यामुळे जवळपास सर्व महत्त्वाच्या भारतीय शहरांमध्ये टाटाचे ऑफिस आणि कंपन्या आहे. तर तब्बल 46 देशांमध्ये 150 ठिकाणी TCS चे ऑफिस आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            