Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Widow Pension Scheme : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

Widow Pension Scheme

Maharashtra Widow Pension Scheme Benefits : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांच्या हितासाठी विधवा पेन्शन योजना सुरू केली. ही योजना जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आली. विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त सर्व विधवा महिला आणि गरीब कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना दिला जातो.

Widow Pension Scheme : महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना राबविली जाते. विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी विधवा महिलांची वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ६०० रुपये दिले जातात. याशिवाय ज्या विधवेला मुले असतील त्यांना 900 रुपये दिले जातात. महिलांना दिलेली रक्कम दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

या योजनेचे फायदे काय आहेत

  1. या योजनेंतर्गत विधवा महिलांना सरकारकडून दरमहा ६०० रुपये दिले जातात.
  2. जर एखाद्या महिलेला मुले असतील तर तिला दरमहा 900 रुपये दिले जातात , जेणेकरून ती आपल्या मुलाची सहज काळजी घेऊ शकेल.
  3. पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,00,000 पेक्षा जास्त नसावे .
  4. योजनेंतर्गत मिळणारी पेन्शनची रक्कम दरमहा महिलेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
  5. महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी सरकारने 23 लाखांचा अर्थसंकल्प तयार केला आहे .
  6. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील विधवा महिला घेऊ शकतात. जेणेकरून त्यांना कुणापुढे झुकावे लागणार नाही आणि त्या सशक्त आणि स्वावलंबी बनू शकतील.
  7. महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळणार्‍या पेन्शनने त्या स्वतःचे जीवन जगू शकतील,त्या कोणावरही अवलंबून राहणार नाहीत.

विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता

  1. लाभार्थी महिला महाराष्ट्रातील किमान 15 वर्ष स्थानिक रहिवासी असावी.
  2. पात्र उमेदवाराकडे स्वत:चे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  3. विधवा महिलेचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  4. विधवा महिलेचे वय 40 ते 65 वर्षे असावे.
  5. पात्र उमेदवार दारिद्र्यरेषेखालील (Below Poverty Line) असावा.
  6. अर्ज करणारी महिला महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, महाराष्ट्र अपंग निवृत्तीवेतन योजना किंवा इतर योजनांची लाभार्थी नसावी. तसेच सदर विधवा महिलेने दुसरे लग्न केले असल्यास ती या योजनेसाठी अपात्र ठरेल.

महत्त्वाची कागदपत्रे

  1. लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा ओळख प्रमाणपत्र
  2. वयाचा दाखला
  3. वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  4.  जातीचे प्रमाणपत्र
  5. पासपोर्टसाईज फोटो
  6. पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  7.  लाभार्थ्याचा रहिवासी दाखला
  8. बॅंक खाते पासबुक

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा

  1. पेंशन योजनेसाठी अर्ज डाऊनलोड करा.
  2. अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा.
  3. त्या सोबत कागदपत्रे जोडा.
  4. कागदपत्रे जोडलेला अर्ज तुमच्या जवळच्या संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय,   तहसीलदार किंवा कलेक्टर कार्यालयात जमा करा.