India First Apple Store : ॲपलने भारतात आज आपले पहिले ऑफलाइन रिटेल-आउटलेट लॉन्च केले. आज उद्घाटन होण्याआधी कंपनीने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 20,000 चौरस फूटामध्ये असलेल्या रिटेल स्टोअरची झलक दाखविली. ॲपलचे हे स्टोअर्स स्थापत्य कलेचा (Architecture) उत्तम नमुना आहे.
Table of contents [Show]
उत्कृष्ट कला-स्थापत्याचा नमुना
ॲपलचे स्टोअर्स त्यांच्या विशिष्ट गुणांसाठी जगभरात ओळखले जातात. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक आश्चर्यकारक असे स्थळ असू शकते, म्हणटल्यास वावगे ठरणार नाही. येथे एकापेक्षा एक असे सर्रास डिझाइन्स आहेत. येथील फर्निचर तयार करण्यासाठी लाकुड आणि टाईल्सचा अत्यंत सुबक पध्दतीने वापर केलेला आहे. स्टोअर्सच्या दगडी भिंती बांधण्यासाठी राजस्थान येथुन दगड मागविले आहेत. तर तळमजला आणि पहिल्या मजल्याशी जोडणारा 14 मीटर लांब असा स्टेनलेस स्टिलचा जिना आहे.
20 वेगवेगळ्या भाषा बोलणारे कर्मचारी
Apple BKC स्टोअरमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, जे एकूण 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्यास सक्षम आहे. भारतातील या स्टोअर मध्ये ग्राहकांना जगभरातील इतर ॲपल स्टोअर प्रमाणेच सेवा आणि अनुभव मिळणार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधून उत्तम सेवा मिळणार आहे.
विविध प्रशिक्षणाची सोय
Apple BKC मध्ये, ग्राहकांना ट्रेड इन प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी आहे. हे प्रशिक्षण घेऊन ग्राहकाला iPhones, Macs किंवा iPads मधील योग्य मॉडेल निवडण्यास मदत होते. तसेच आपले जुने डिव्हाईसेस एक्सचेंज करुन; नवीन मॉडेल खरेदी करण्याची ऑफर देखील दिली जाणार आहे. तसेच काही तज्ञ, कर्मचारी आणि ॲपल निर्माते यांच्या माध्यमातून काही प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबईतील संस्कृती आणि आधुनिकतेचा मेळ
ॲपल स्टोअर मध्ये दैनंदिन कामकाजासाठी लागणारी विज ही 100 टक्के स्वच्छ आणि कार्बन विरहीत ऊर्जे मधून मिळवली आहे. सध्या मुंबई येथील स्टोअर मध्ये 100 हून अधिक लोकांची टीम तयार केलेली आहे. तसेच येथे तुम्हाला मुंबईतील संस्कृती आणि आधुनिकता यांचा मेळ घातलेला दिसुन येईल.