Pune Metro : पिंपरी-चिंचवड व पुणे शहराला जोडणारा मेट्रो मार्ग अनेक वर्षं प्रलंबित होता. पण, आता त्याचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. आणि येत्या 15 मे ला या मार्गाचं उद्घाटन होईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पुणेकरांमध्ये आनंद पाहायला मिळतो.
पुण्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांची गर्दी यामुळे पुण्यामध्ये सुसज्ज अशी सार्वजनिक वाहतुक सेवा अस्तित्वात आणणं गरजेचं होतं. महानगरपालिका बसेसच्या माध्यमातून जरी वाहतुक सेवा उपलब्ध असली तरी ती अपूरी व प्रवासासाठी लागणार वेळ हा जास्त होता. त्यामुळे या मेट्रो सेवेच्या माध्यमातून पुणेकरांचा प्रवास हा अधिक जलग आणि सुकर होणार आहे.
महामेट्रो अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या मार्गिकेवरील फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंतचे मेट्रोचे काम हे पूर्ण झालं असून 15 मे पर्यत या मार्गाचे लोकार्पण करण्यात येईल अशी अपेक्षा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेस या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. या मार्गावरची ट्रायल रन सुद्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे आता फक्त रेल्वे सेफ्टी कमिशनरकडून आवश्यक परवानगी आल्यावर ही सेवा लोकांच्या सेवेसाठी खूली करण्यात येणार आहे.
पुढील प्रस्तावित मार्गाचे काम
पुणे मेट्रो प्रकल्पा अंतर्गत एकुण तीन मार्ग नियोजित केलेले आहेत.या तिन्ही मार्गाना शिवाजीनगर न्यायालयाजवळ जोडण्यात येणार आहे. या तिन्ही मार्गाना परस्पर जोडणाऱ्या स्थानकाला सिव्हील कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलं असून या स्थानकाचं काम सुद्धा वेगात सुरू आहे.
अशाप्रकारे बांधली जात आहे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची भव्य इमारत...
— Pune Metro Rail (@metrorailpune) April 17, 2023
कामाचा आढावा देणारे उंचावरून घेतलेले हे छायाचित्र खास तुमच्यासाठी !#WorkInProgress #WeWillMakeIt #PuneMetro #GreenMetro pic.twitter.com/M49MlLPdSj
या मेट्रो प्रकल्पातील पहिला मार्ग म्हणजे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. हा मार्ग 16.59 किमीचा असून याचे काम महामेट्रो अंतर्गत करण्यात येणार आहे. या मार्गावरील आता फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंतचा मार्ग तयार झाला आहे. या मार्गामध्ये एकुण 14 स्थानक असणार आहेत.
मेट्रो मार्गाचा दुसरा मार्ग वनाझ ते रामवाडी असा असून या मार्गावरील रूबी हॉल स्थानकाचं काम पूर्ण झालं आहे. तर गरवारे कॉलेज आणि पिसीएमसी हेडक्वाटर्स या स्थानकांचे काम पुढील दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे.
मेट्रोचा तिसरा मार्ग आहे तो म्हणजे पुण्यातील आयटी हब हिंजवडी आणि पुणे शहराला जोडणारा. या मार्गाचं काम सुद्धा वेगवान पद्धतीने सुरू आहे. एकुण 23.33 किमीच्या या मार्गाचं काम पुणे मेट्रोपोलिटिन रिजन डेव्हलपमेंट ऑथेरिटी (PMRDA) तर्फ करण्यात येणार आहे.