Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. अमेरिकन डॉलर मजबूत स्थितीत गेलाय. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह मे महिन्यात व्याजदरात वाढ करणार आहे. या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार मात्र चिंतेत आहेत. त्यामुळे डॉलर मात्र मजबूत झालाय.

कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास 2 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. यामुळे आर्थिक सुधारणांच्या आशेवर (economic recovery hopes) पाणी फेरलं जाऊ शकतं. ब्रेंट क्रूड फ्युचर्स 1.55 डॉलर किंवा 1.8 टक्क्यांनी घसरून 84.76 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावलं, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 1.69 डॉलर किंवा 2.1 टक्क्यांनी घसरून 80.83 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावलं. या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्सनी गेल्या आठवड्यात सलग चौथा साप्ताहिक नफा कमावला. 2022च्या मध्यानंतरचा हा सर्वात मोठा आहे.

डॉलरचा निर्देशांक व्याजदर वाढीसह मजबूत

अमेरिकन (यूएस) डॉलरचा निर्देशांक व्याजदर वाढीसह मजबूत होतोय. यामुळे डॉलर-नामांकित तेल इतर चलन धारकांसाठी जास्तच महाग होतंय. सोमवारी तो सुमारे 0.6 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. मे महिन्यात फेड त्यांचा व्याजाचा दर वाढवेल, अशी पैज व्यापारी लावतायत. साधारणपणे या वर्षीच्या शेवटापर्यंत दर कपातीची अपेक्षा करण्यात येतेय. अशी परिस्थिती साधारणपणे मंदीमध्ये होते. याच दरम्यान, मंगळवारी 0200 GMTवाजता चीनच्या पहिल्या तिमाहीतल्या सकल देशांतर्गत उत्पादनाचे (GDP) आकडे जाहीर होण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या (IEA) अंदाजानुसार 2023मधल्या मागणीच्या वाढीसाठी ते सर्वात जास्त जबाबदार असणार आहेत.

तेल पुरवठ्यातली तूट वाढणार?

ओपेक प्लस (OPEC+) उत्पादकांनी घोषित केलेल्या उत्पादन कपातीमुळे या वर्षाच्या उत्तरार्धात अपेक्षित तेल पुरवठ्यातली तूट वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ग्राहकांना आणि जागतिक आर्थिक सुधार प्रक्रियेला अधिक फटका बसू शकतो, असं इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं (International Energy Agency) आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

मॉस्कोच्या उत्पन्नावर मर्यादा

ग्रुप ऑफ सेव्हनच्या (G7) अधिकाऱ्यानं व्यक्त केलेल्या मतानुसार, समुद्रातून निघालेल्या रशियन तेलावर प्रति बॅरल किंमत कॅप 60 डॉलर ठेवेल. जागतिक स्तरातवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तर काही देशांनी मॉस्कोच्या उत्पन्नावर मर्यादा घालण्यासाठी कमी किंमतीची मर्यादा मागितलीय. सौदी अरेबियामध्ये, फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाची निर्यात जानेवारीमध्ये 7.658 दशलक्ष bpd वरून घसरून 7.455 दशलक्ष बीपीडीवर (bpd) आलीय.

...तर ते रेकॉर्डवरचं सर्वोच्च

सात सर्वात मोठ्या शेल बेसिनमध्ये अमेरिका (यूएस) शेल कच्च्या तेलाचे उत्पादन मे महिन्यात 49,000 बीपीडीनं (bpd) 9.33 दशलक्ष बीपीडीपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. असं झालं तर ते रेकॉर्डवरचं सर्वोच्च असणार आहे, अशी माहिती इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीतर्फे देण्यात आली.

मागच्या वर्षी वाढला होता दर

मागच्या वर्षातल्या (2022) आकडेवारीवर नजर टाकल्यास ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव 10.5 टक्के वाढला होता. कच्च्या तेलाच्या किंमतीत 6.7 टक्के वाढ झाल्याचं समोर आलं होतं. फेब्रुवारी 2022मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा खूपच कमी झाला होता. त्यामुळे सहाजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात कमालीची तेजी आली होती. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 139 डॉलर इतका वाढल्याचं दिसून आलं होतं.