Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

ऑनलाईन रमी गेममध्ये गमावले तब्बल 52 लाख, कर्जबाजारी युवकाची किडनी विकण्याची तयारी!

Online Rummy Game: ऑनलाईन रमी गेमच्या विळख्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात अडकताना दिसते आहे. गेम्सच्या आहारी गेलेल्या दिल्लीतील एका युवकाने तर तब्बल 52 लाख रुपये गमावले आहेत. कर्जबाजारी झालेल्या या युवकावर आता किडनी विकण्याची वेळ आली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण.

Read More

Tejas Express Vista dome Coach : तेजस एक्स्प्रेसला मिळणार आणखी एक विस्टाडोम कोच

Tejas Express Vista dome Coach : तेजस एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेनं सुरू केलेली सेमीस्पीड सेवा आहे. आणि या ट्रेनचं एक आकर्षण आहे तो चारही बाजूंनी काचेचं आवरण असलेला व्हिस्टा डोम कोच. त्याची वाढती लोकप्रियता पाहून आता रेल्वेनं ट्रेनला दोन व्हिस्टा डोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे

Read More

Samosa Singh : केवळ समोसा विकणाऱ्या कंपनीचे वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपये

Bengaluru Samosa Singh : केवळ समोसे विकण्याचं दुकान थाटून, कुणी आपला वार्षिक टर्नओवर 45 कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो. असे तुम्हाला कुणी सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही ना? मात्र बंगळुरूमधील एका जोडप्याने असे करुन दाखविले आहे.

Read More

Shilpa Shetty Mercedes-Benz SUV : एअरपोर्टवर दिसलेली शिल्पा शेट्टीची महागडी कार कुठली?

Shilpa Shetty : अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या विविध लुकमुळे सदैव चर्चेत राहतात. मात्र गेल्या काही वर्षांपासुन ते त्यांच्या नवनवीन वाहनांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा देखील तिच्या 'मर्सिडीज़-बैंज GLS600 मेबैक लग्जरी SUV' गाडीमुळे चर्चेत आहे. कारण तिच्या या गाडीची किंमत तब्बल 3.5 कोटी रुपये आहे.

Read More

World's Most Expensive Sandwich : रिलॉन्च झालं जगातलं सर्वात महागडं सॅन्डवीच, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद

World's Most Expensive Sandwich : न्यू-यॉर्कमधल्या सिरेनडिप्टी 3 या रेस्टारंटने आपलं महागडं सॅन्डवीच पुन्हा रिलाँन्च केलं आहे. सोन्याचा वर्ख, दुर्मिळ चीजने बनलेले 214 डॉलरचं हे सॅन्डवीच जगातलं सर्वात महाग सॅन्डवीच असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही केली आहे.

Read More

Lamborghini Urus S : भारतात लाँच झालेल्या लँबॉर्गिनीची किंमत ठाऊक आहे?

Lamborghini Urus S : भारतात विविध कंपनीच्या SUV रेंजच्या गाड्या मार्केटमध्ये येत आहेत. पण, आता भारतीय बाजारपेठेची भुरळ लँबॉर्गिनी या एलिट ब्रँडलाही पडली आहे. त्यांनी युरस एस (Lamborghini Urus S) ही आपली अल्ट्रारिच गाडी भारतात लाँच केलीय. तिची किंमत आहे 4.18 कोटी रुपये फक्त.

Read More

Kolkata Dhanadhanyo Auditorium : शिंपल्याच्या आकाराचं 440 कोटी रुपयांचं हे ऑडिटोरिअम आहे तरी कसं, पाहूया 5 फोटोंमधून

Kolkata Dhanadhanyo Auditorium : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल कोलकत्यातील धनाधान्यो सभागृहाचं (Auditorium) उद्धघाटन केलं. शंखाच्या आकारामध्ये बनवलेलं हे सभागृह आपलं लक्ष वेधुन घेतं. या सभागृहामुळे कोलकत्याची सुंदरता आणखी उजळून निघाली आहे.

Read More

Women Investor in India : तीन वर्षात 27 लाखांपेक्षा जास्त महिलांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

भारतामध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांमधील महिलाही SIP मध्ये गुंतवणूक करत आहेत. मागील तीन वर्षात 27 लाख 50 हजार महिलांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली. नोकरी व्यवसायासाठी महिला बाहेर पडत असल्याचे या आकडेवारीतून दिसते. हा टक्का दिवसेंदिवस वाढत असून महिला आर्थिक स्वावलंबी होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

ईडी कडून बीबीसी विरोधात FEMA अंतर्गत गुन्हा दाखल, फेमा कायदा नेमका काय आहे?

ED - फेब्रुवारी महिन्यांमध्ये आयकर विभागाकडून (Income Tax Department) बीबीसीच्या (BBC) मुंबई व दिल्ली कार्यालयात छापे टाकण्यात आले. यावेळी आयकर विभागाला बीबीसीच्या व्यवयासायमध्ये आणि उत्पन्नामंमध्ये तफावत आढळून आलेली. तसेच किंमत हस्तांतरणाच्या (Pricing Documentation) च्या नियमांचंही उल्लंघन केल्याचं दिसून आलं. यानंतर आता ईडीने फेमा कायद्या (FEMA Act) अंतर्गत बीबीसीवर गुन्हा दाखल केला आहे.

Read More

Milk Price Hike: वर्षभरात दूधाचे दर 12% नी वाढले; भाववाढ होण्यामागील कारणे काय?

मागील एक वर्षात दूधाच्या किंमती प्रति लीटर 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येक घरात दूधाचे सेवन होते. तसेच दूधापासून तयार केलेल्या पदार्थांनाही मोठी मागणी असते. दुधात सतत दरवाढ होत असल्याने दुग्धजन्य पदार्थांच्याही किंमती वाढल्या आहेत. दूध दरवाढ नियंत्रणात आणण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. नाहीतर पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही दुधाचे दर हा मुद्दा गाजू शकतो.

Read More

Recession Prediction : भारतात मंदीची शक्यता शून्य? इंग्लंड-अमेरिकेची स्थिती मात्र वाईट!

Recession Prediction : महागाईनं एकीकडे जनता त्रस्त असताना आता त्यानंतर मंदीच्या संकटाचा जगाला सामना करावा लागत आहे. याविषयी केलेल्या एका अभ्यासाअंती काही निष्कर्ष काढण्यात आलेत. यानुसार भारतात मंदीची काहीच शक्यता नाही. तर दुसरीकडे अमेरिका, इंग्लंड तसंच न्यूझीलंड या देशांची स्थिती मात्र सर्वात वाईट असेल, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आलाय.

Read More