Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bournvita Controversy: बोर्नविटा मुलांच्या आरोग्यास हानिकारक आहे का? इन्फ्लूएनसरच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

Bournvita Controversy

एका इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसरने बोर्नविटावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला. बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून हे ड्रिंक आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता. सोशल मीडियावर 1 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी हा व्हिडिओ पाहिला. सेलिब्रिटिंनी सुद्धा हा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला. मात्र, कॅटबरी कंपनीने या इन्फ्लूएनसरला कायदेशीर नोटीस धाडली. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Bournvita Controversy: कॅडबरी कंपनीची उत्पादने भारतात प्रसिद्ध आहेत. चॉकलेट बनवणारी ही कंपनी लहान मुलांचे आवडते बोर्नविटा सुद्धा बनवते. मात्र, हे बोर्नविटा खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. एका इन्फ्लूएन्सरने बोर्नविटा लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मोठ्या सेलिब्रेटिंनीसुद्धा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला होता. १ कोटींपेक्षा जास्त युझर्सनी हा व्हिडिओ पाहिला.

इन्फ्लूएनर्ससच्या व्हिडिओमध्ये काय आहे?

रेवंत हिमतसिंग्का (Revant Himatsingka) असे या इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसरचे नाव आहे. त्याचा फूड फार्मर (Food Pharmer) नामक इन्स्टाग्राम चॅनल आहे. यावर त्याने बोर्नविटा प्रॉडक्टचा रिव्हू व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये रेवंतने दावा केला होता की, बोर्नविटामध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि शरीराला हानीकारक असे केमिकल्स आहेत. कोरोनाच्या आधी बोर्नविटा पॅकेटवर इम्युनिटी बुस्टर असा शब्द नव्हता. मात्र, विक्री वाढवण्यासाठी उत्पादनात कोणताही बदल न करता फक्त इम्युनिटी शब्द पॅकेटवर टाकला, असे त्याने म्हटले आहे.

"तैयारी डायबेटिज की"

कर्करोगाला आमंत्रण देतील असे केमिकल्स बोर्नविटामध्ये आहेत. बोर्नविटा शरीरास अपायकारक असून पालकांनी मुलांना अजिबात देऊ नये. त्यांची टॅगलाइन तैयारी जीत की, ऐवजी "तैयारी डायबिटीज की", अशी हवी. यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त आहे. जे मुलांना कमजोर बनवेल. त्यामुळे सरकारने बोर्नविटावर कारवाई करावी, असे आवाहन रेवंतने व्हिडिओमध्ये केले होते.

रेवंतने पोस्ट केलेला व्हिडिओ काही दिवसांत कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचला. अनेक सेलिब्रिटिंनी सुद्धा हा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला. अभिनेता परेश रावल, माजी क्रिकेटर आझाद किर्ती यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. अभिनेता आर. माधवनने देखील हा व्हिडिओ लाइक केला. सोशल मीडियावर या व्हिडिओसाठी अनेक कमेंटही आल्या होत्या.

कंपनीने आरोप फेटाळले

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅडबरी कंपनीला जाग आली. इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसर रेवंत हिमतसिंग्का याला कंपनीने तत्काळ कायदेशीर नोटीस पाठवली. तसेच व्हिडिओत केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. या आरोपांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. बोर्नविटा हे उत्पादन सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड ड्रिंक आहे. सरकारच्या नियमांचे पालन करूनच उत्पादन बनवण्यात आले आहे. मागील अनेक दशकांपासून भारतीय बोर्नविटाचे सेवन करत आले आहेत, असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. बोर्नविटा बाबत खोटी माहिती पसरवल्याचा आरोप कंपनीने रेवंतवर ठेवला. 

कायदेशीर नोटीस येताच इन्फ्लूएनसरने व्हिडिओ काढून टाकला

रेवंत हिमतसिंग्काला हा व्हिडिओ इतका व्हायरल होईल याची कल्पना देखील नव्हती. कॅडबरी कंपनीकडून कायदेशीर नोटीस आल्यानंतर त्याने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ डिलिट केला. तसेच कंपनीची, बोर्नविटा ब्रँडची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू नव्हता, असे म्हणत माफी मागीतली. हा माफीनामा त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

दरम्यान, व्हिडिओ काढून जरी टाकला असला तरी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर माध्यमांवर ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी रेवंतला पाठिंबा दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांची जनजागृती करणारा व्हिडिओ बनवल्याबद्दल सोशल मीडियावर रेवंतचे अनेकजण आभार मानत आहेत.