Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Store India : एकीकडे ॲपल स्टोर सुरू होत असताना ॲपल प्रोडक्ट्सची विक्रीही वाढली

Apple Store India

Image Source : www.irishexaminer.com

Apple Store India : आज मुंबईतील BKC इथं आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेतमध्ये ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यासाठी काल टिम कुक भारतात दाखल झाले. तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतात ॲपलची विक्री वाढण्यातही झालेला दिसून येत आहे.

Apple's Revenue In India Increased : या आठवड्यात ॲपल कंपनीने भारतात पाऊल ठेवल्याच्या घटनेस 25 वर्ष पूर्ण होत आहे. त्यासाठी ॲपलने भारतामध्ये मार्केट काबीज करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आखल्याचे दिसून येतेय. त्याचाच एक भाग म्हणून  आज मुंबईतील बिकेसी येथे आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेत येथे ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. याचाच सकारात्मक परिणाम बघता  iPhone निर्माता Apple ची विक्री भारतात झपाट्याने वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची विक्री 6 बिलियन डॉलर होती. आणि आता भारतातील ॲपलचा महसूल एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढला आहे.

ॲपल प्रेमींच्या संख्येत वाढ

ॲपल कंपनीने 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात आपला व्यवसाय वेगाने विस्तारला आहे. भारतातील कंपनीचे स्मार्टफोन आणि संगणक त्यांच्या उच्च किमतींमुळे कधीही माफक बाजारपेठेपेक्षा जास्त हिस्सा मिळवू शकले नाहीत. जागतिक तंत्रज्ञानाची मागणी कमी होत असताना, Apple ने भारतातील वाढत्या मध्यमवर्गाला एक आकर्षक संधी म्हणून ओळखले आहे. ॲपल भारतातही स्थानिक उत्पादनात देखील झपाट्याने वाढ करत आहे. तर भारतात आज आणि 20 एप्रिल रोजी सुरु होत असलेल्या ॲपल स्टोअर्स मुळे ॲपलच्या आयफोन प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.

2020 मध्ये सुरुवात

ॲपल कंपनीचे पहिले ऑनलाईन स्टोअर 2020 मध्ये सुरु करण्यात आले. आणि आज मुंबईतील बिकेसी येथे पहिले स्थानिक स्टोअर उघडत आहे. तर त्याच्या दोन दिवसानंतर दिल्ली येथे देखील स्टोअर उघडत आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होम या कलचरमुळे ॲपल आयफोनच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली. या काळात लोकांनी आयफोन आणि आयपॅड खरेदी केले.  

प्रिमियम बाजारपेठेवर ॲपलचा डोळा

ॲपलची मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इतर सर्व उत्पादने प्रिमियम सिरिजमध्ये मोडतात. या उत्पादनांच्या किंमती जास्त असून; फक्त श्रीमंत वर्गच ॲपलची उत्पादने खरेदी करतो. श्रीमंत वर्गावर कुठल्याही वस्तुच्या किंमत वाढीचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे या वस्तूंच्या किंमती वाढल्या तरी खरेदी कमी होत नाही. या संधीचे सोने करण्यास ॲपल कंपनीने पूढाकार घेतलेला आहे. भारतातील प्रिमियम श्रेणीतील ग्राहक काबीज करण्यासोबतच मार्केट फूटप्रिंट वाढवण्याकडे ॲपल लक्ष देत आहे. त्यास सरकारची साथ असल्याचे दिसून येते आहे. कारण या बुधवारी Apple चे सीइओ टीम कूक हे पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेणार आसल्याचे, वृत्त आहे.

वास्तविक्ता काय आहे

वास्तविक्ता ही आहे की,भारतातील 700 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी फक्त 4% लोकांकडे आयफोन आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोबाईलची बाजारपेठ असलेल्या भारतात स्वस्त, स्थानिक ब्रँड तसेच चीनी आणि दक्षिण कोरियन कंपन्यांचे वर्चस्व आहे. Apple चे स्टोअर जगातील सर्वात ब्रँडेड कंपनीसाठी प्रमुख रिटेल आणि शोकेस पॉइंट म्हणून काम करतात. ते अनेकदा पर्यटकांचे आकर्षण केंद्रही ठरतात.

टीम कूकने घेतला वडापावचा आस्वाद

Apple चे सीइओ टीम कूक यांनी काल भरतात येताच मुंबईची सैर करीत महत्वाच्या लोकांच्या भेटी घेतल्या. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथे जाऊन त्यांनी आकाश अंबानी आणि ईशा अंबानी सोबत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत स्ट्रीट फूड वडा पावचा आस्वाद देखील घेतला. सोबतच त्यांनी संबंधित फोटो ट्विट करीत माधुरीचे आभार देखील मानले.