Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Domestic Air Traffic : देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली

Air Traffic Grows

Image Source : www.www.moneycontrol.com

India Domestic Air Traffic : आर्थिक वर्ष 2022-2023 च्या 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत, प्रवासी वाहतुकीत मागील वर्षाच्या तुलनेत 51.7 टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिसुन आली आहे.

India Domestic Air Traffic : मार्च 2023 मध्ये देशाअंतर्गत हवाई प्रवासी वाहतूक इतर वर्षांच्या तुलनेत 21.4 टक्कयांनी वाढली आहे, अशी माहिती नागरी विमान उड्डयण महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार पूढे आलेली आहे. कोव्हिड नंतरच्या काळात लोकांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि यावेळी लोकांचा कल विमान प्रवासाकडे आहे, असा याचा अर्थ लावला जात आहे. प्रत्यक्ष किती लोकांनी विमानाने प्रवास केला हा आकडाही लोकांचा कल दर्शवणारा आहे. 

मार्च 2023 मध्ये किती लोकांनी केला विमान प्रवास 

विमान कंपन्यांनी देऊ केलेल्या सवलती, कोरोना नंतरच्या काळात लोकांमध्ये प्रवास आणि पर्यटनाबद्दल असलेली उत्सुकता तसंच नवतरुण वर्गाची जास्त पैसे खर्च करण्याची मानसिकता यामुळे देशात प्रवास आणि वाहतुकीचा कल झपाट्याने बदलत आहे. DGCI ने दिलेल्या या ताज्या आकडोवारीतून हेच स्पष्ट होतं. 

मार्च 2023 मध्ये तब्बल 12.89 कोटी लोकांनी विमान प्रवास केला. हे प्रमाण गेल्यावर्षी याच महिन्यातल्या आकडेवारीपेक्षा तब्बल 20% जास्त आहे. यात कोरोना हे एक कारण असलं तरी विमान प्रवाशांच्या संख्येत मागच्या काही वर्षांत सातत्याने वाढ दिसून येत आहे हे तितकंच खरं आहे. कारण, मार्च 2022 मध्ये प्रवाशांची संख्या 10.62 कोटी इतकी होती. तर मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत गेल्यावर्षी याच तिमाहीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत 51% वाढ झाली आहे. 

जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत देशाअंतर्गत विमानसेवेद्वारे प्रवासी वाहतूक 375.04 लाख होती. जी मागील वर्षाच्या याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान 247.23 लाख होती. ज्यामुळे2023 मध्ये वार्षिक वाढ 51.70 टक्के नोंदवली गेली आहे, अशी माहिती DGCA ने (Directorate General of Civil Aviation) 18 एप्रिल रोजी दिली.

इंडिगो एअरलाईन्सची शेअर बाजारातही भरारी 

शेअर मार्केटमध्ये देशातील सर्वात मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोने या महिन्यात आपली पकड मजबूत केली. मार्चमध्ये एअरलाईनची शेअर मार्केटमधील वाढ 56.80 टक्क्यांनी वाढली. इंडिगो इंटरग्लोब कंपनीचा शेअर सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात 1,950 च्या वर ट्रेड करत आहे. इंडिगो कंपनीचा देशांतर्गत बाजारात प्रवाशांचा हिस्साही वाढला आहे. याशिवाय एअर इंडिया, स्पाईसजेट, विस्तारा आणि गो फर्स्ट या कंपन्यांच्या हिस्सेदारीत मामुली घसरण पाहायला मिळाली. 

तर इंडिगो कंपनीच्या फ्लाईट रद्द होण्याचं प्रमाण 1.5% इतकं होतं. 

या बाबतीत फ्लाईट रद्द होण्याचं सर्वात कमी प्रमाण एअर इंडियाचं 0.28% तर सर्वात जास्त प्रमाण 4.48% फ्लाय बिगचं होतं.