Lowest Interest Rates On Gold Loan : देशात सुरु असलेली आर्थिक मंदी आणि अमेरिकेतील बँकिंग संकटाचे सावट सोने दरावर दिसु लागले आहे. सोन्याच्या किमतीने 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,000 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. आणि थोडी फार किंमत घसरुन सोने आता 59,600 वर आले आहे. ज्यांनी सोन्यात पैसे गुंतविले होते त्यांना ते पैसे परत पाहिजे आहेत. तसेच ज्यांना आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सोने गहाण ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी काही महत्वाची माहिती आज आम्ही देत आहोत.
कोणती बँक किती टक्के व्याजदर देणार
(5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी)
- बँक ऑफ इंडिया 8.45 टक्के व्याज दर देते. म्हणजे तुम्हाला महिन्याला 22,716 रुपये कर्ज भरावे लागेल.
- युनियन बँक ऑफ इंडिया 8.65 टक्के दराने व्याजदर देणार. म्हणजे 22,762 रुपये मासिक सोने कर्ज भरावे लागणार.
- त्यानंतर यूको बँक 8.8 टक्के व्याजदर देणार. म्हणजेच 22,797 रुपये सोने कर्ज
मासिक भरावे लागणार. - पंजाब अॅण्ड सिंड बँक दोन वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावर 8.85 टक्के व्याजदर आकारते. म्हणजे तुम्हाला 22,808 रुपयांचा EMI भरावा लागेल.
- इंडियन बँक 8.95 टक्के व्याजदर आकारते. दोन वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावरील EMI 22,831 रुपये भरावा लागेल.
- तर बँक ऑफ बडोदा ही 9.15 टक्के व्याज दर आकारते. म्हणजे कर्जदारांना 22877 रुपये EMI भरावा लागेल.
- पंजाब नॅशनल बँक 9.25 टक्के दराने व्याजदर आकारते. त्यामुळे 5 लाख रुपयांच्या सुवर्ण कर्जावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी 22,900 रुपये EMI भरावी लागेल.
- तर राज्य सरकारची बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र दोन वर्षांच्या कालावधीसह 5 लाख रुपयांच्या कर्जावर 9.3 टक्के व्याजदर आकारते.म्हणजेच कर्जदाराला 22911 रुपयांचा ईएमआय भरावा लागतो.
सामान्य पात्रता निकष काय असावेत
तुम्हाला तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घ्यायचे असल्यास, तुम्ही बँकेच्या पात्रता निकषांची पूर्तता करता की नाही? हे तपासणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की, वेगवेगळ्या बँकांचे पात्रता निकष वेगवेगळे आहेत. म्हणून, सुवर्ण कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, एखाद्याने त्यांच्या पात्रतेच्या निकषांबद्दल जाणून घेण्यासाठी त्या बँकेच्या वेबसाइटला भेट दिली पाहिजे. तर जवळपास सर्वांनाच लागू होणारे आणि सामान्य पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.
- त्या व्यक्तीकडे अश्या प्रकारचे सोन्याचे दागिने किंवा वस्तू असाव्यात ज्या गहाण ठेवता येतील.
- गहाण ठेवलेल्या सोन्याची शुद्धता 18 कॅरेट किंवा त्याहून अधिक असावी.
- अर्जदार क्रेडिट-पात्र असणे आवश्यक आहे.