Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Onion Prices Hike: देशभरात कांद्याच्या किंमतीत वाढ, आवक घटल्याने भाववाढीचे सावट

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना आता कांद्याची भाववाढ सामान्य नागरिकांना रडवणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र कांद्याची ही भाववाढ महिनाभरच राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read More

Tomato Price Hike: 300 रु. किलो भावाने मिळू शकतात टोमॅटो! दिल्लीकर महागाईने बेजार…

टोमॅटोची आवक घटण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तरेतील राज्यांमध्ये होणारी अतिवृष्टी. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथून मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि इतर राज्यांना टोमॅटोचा पुरवठा होत असतो. मात्र गेल्या महिना-दोन महिन्यांपासून त्या राज्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे दळणवळणाची व्यवस्था कोलमडली आहे. तसेच शेती पिकांचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोचा भाव कमी होणार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आवक वाढली…

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोच्या नवीन पिकाच्या अधिक पुरवठ्यामुळे किरकोळ किरकोळ किमतीत घसरण होण्याची अपेक्षा आहे. मान्सूनच्या पावसामुळे आणि इतर समस्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव वाढले होते असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

Read More

Investment in commodity market: कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करणार आहात? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

Investment in commodity market: कमोडिटी मार्केटमध्ये ट्रे़ड करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सध्याची परिस्थिती पाहता डॉलर निर्देशांकात पुन्हा एकदा मजबूती परतताना पाहायला मिळत आहे. सोनं 2 महिन्यांच्या उंचीवरून आता घसरलं आहे, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. पार्श्वभूमीवर काही बाबी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

Read More

Tur Dal Price Hike: तूर डाळीचे भाव कडाडले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 32% भाववाढ

गेल्या काही दिवसांपासून तूर डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. डाळीची साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारने कारवाईचा बडगा देखील उभारला होता. मात्र या कारवाईला म्हणावे तितके यश मिळताना दिसत नाहीये.

Read More

Bharat Dal: देशात अनुदानित चणा डाळ विक्रीला सुरुवात, 60 रुपये किलो दराने सरकार करणार विक्री

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चनाडाळची विक्री 'भारत डाळ' या ब्रँड नावाने सुरू करण्यात आली आहे. हा भारत सरकारद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या चणा डाळीचे नाव आहे. 60 रुपये किलो दराने ही डाळ ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच 30 किलोपेक्षा जास्त डाळीची खरेदी केल्यास ग्राहकांना 55 रुपये दराने ही डाळ मिळणार आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे महागाईत भर, RBI ने व्यक्त केली चिंता

RBI चे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने सादर केलेल्या बुलेटीननुसार टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे देशातील एकूण चलनवाढीमध्ये कमालीचा परिणाम जाणवू लागला आहे. टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारातील इतर भाज्यांच्या किमतीवर देखील पाहायला मिळतो आहे.

Read More

Tomato Price: जुन्नरमधल्या शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून कमावले तब्बल 2.8 कोटी रुपये!

ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर हे मिळून शेती करतात. बारा एकर शेतीत त्यांनी यावर्षी टोमॅटोचे पीक घेतले होते. गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सातत्याने टोमॅटोचे पीक घेत आहेत. यावर्षी त्यांच्या शेतात टोमॅटोचे दमदार उत्पन्न निघाले असून त्यांनी आतापर्यंत 17,000 क्रेट विकले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचे भाव वधारले असताना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला आहे.

Read More

Pulses and Lentils Price Hike : डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढल्या, किरकोळ महागाई दरात वाढ

दिवसेंदिवस डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक भार पडत आहे. सामन्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले असल्यामुळे सरकारने वाढत्या किमती नियंत्रित ठेवाव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहेत.

Read More

Garlic Price Hike: टोमॅटो आणि जिऱ्यानंतर लसणाचे वाढले भाव, स्वयंपाकघराचं बजेट बिघडलं

बाजारात लसणाची आवक घटल्यामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. मुंबई, पुण्यात, ठाण्यात तर 50% हून कमी आवक झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षीचा अवकाळी पासून आणि लांबलेला उन्हाळा. फेब्रुवारी-मार्च मध्ये महाराष्ट्रात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे उत्पन्न कमी निघाले आहे.

Read More

Tomato Price Hike: बापरे! 15 रुपयाला एक टोमॅटो, 150 रुपये किलोने टोमॅटोची होतेय विक्री!

किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढले असताना ग्राहक पावशेर किंवा आर्धा किलोच टोमॅटो खरेदी करत आहेत. सध्या मुंबई आणि ठाण्यात नगाप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी एक टोमॅटो 15 रुपयांत विकला जातो आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोची दरवाढ थांबेना, कलकत्त्यात सर्वाधिक 155 रुपये किलो दराने होतेय विक्री!

देशभरात सध्या पावसाने जोर धरला आहे. महाराष्ट्रासह उत्तरी राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना बाजारात माल आणणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे उपलब्ध टोमॅटो चढ्या भावाने विकले जात आहेत. देशातील काही महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 58 ते 148 रुपये प्रतिकिलो होते.

Read More