Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hike in Jaggery Price : मागणी वाढल्याने गूळ महागला, तर कोल्हापूरात गूळ मार्केटमध्ये हमालांचे आंदोलन

Hike in Jaggery Price

एकीकडे गुळाचे दर वाढत असताना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील (Kolhapur Agricultural Produce Market Committee) गूळ मार्केटमध्ये (Jaggery Market) हमालांनी हमालीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आताच्या हमाल वाढीमध्ये 50 टक्के वाढ करण्याची मागणी हमालांनी केली आहे.

धुक्यामुळे गुळाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे, तर थंडीमुळे त्याची मागणी वाढत आहे. कमी उत्पादनात मागणी वाढल्याने गुळाच्या दरात वाढ (Hike in Jaggery Price) होत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागणी खूप वाढण्याची शक्यता असल्याने संक्रांतीपर्यंत गुळाचे दर वाढू शकतात. एकीकडे गुळाचे दर वाढत असताना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील (Kolhapur Agricultural Produce Market Committee) गूळ मार्केटमध्ये (Jaggery Market) हमालांनी हमालीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आताच्या हमाल वाढीमध्ये 50 टक्के वाढ करण्याची मागणी हमालांनी केली आहे.

आठवडाभरात गूळ 200 रुपयांनी क्विंटलने महागला

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर ही गुळाची मुख्य बाजारपेठ आहे. या मंडईचे व्यावसायिक अरुण खंडेलवाल यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून धुक्यामुळे हवामान खराब आहे. त्यामुळे गुळाचे उत्पादन कमी होत आहे. उत्पादन कमी असल्याने बाजारात गुळाची आवकही घटली आहे. या दिवसांत मंडईत 6,000 मण (40 किलो) गुळाची आवक होत आहे, तर आठवडाभरापूर्वी 8,000 पेक्षा जास्त गुळाची आवक झाली होती. आवक घटल्याने बाजारात गुळाचे दरही तेजीत आहेत. आठवडाभरात गुळाच्या घाऊक भावात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात गूळ 2,750 ते 3,225 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. दिल्लीतील गूळ व्यापारी देशराज पप्पी सांगतात की धुक्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याने गुळाचे भाव वाढले आहेत. यासोबतच मागणी वाढल्याने गुळाच्या किमतीतही वाढ झाली आहे.

गूळ आणखी महाग होऊ शकतो

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मकर संक्रांतीपर्यंत गुळाचे भाव आणखी वाढू शकतात. संक्रांतीसाठी गुळाला मोठी मागणी असल्याचे देशराज सांगतात. अशा स्थितीत गुळाच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ होऊ शकते. धुक्यामुळे गुळाच्या उत्पादनावर आणखी परिणाम झाला तर त्याची किंमत 400-500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढू शकते. खंडेलवाल म्हणाले की, पुढे जाऊन गुळाच्या किमती धुक्यामुळे प्रभावित झालेल्या उत्पादनावर अवलंबून असतील.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत हमालांचे आंदोलन

दरम्यान, एकीकडे गुळाचे दर वाढत असताना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये हमालांनी हमालीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आताच्या हमाल वाढीमध्ये 50 टक्के वाढ करण्याची मागणी हमालांनी केली आहे. यावर इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आधीच दर जास्त असल्याने, पैसे वाढवणार नाही अशी भूमिका व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. गुळाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमचे गुळाचे बॉक्स आम्ही उतरतो, आम्हाला हमाल नको म्हणून भूमिका मांडली.