अमेरिकेत नैसर्गिक वायूवर काहीसा दबाव आहे. पण युरोप आणि ब्रिटनमध्ये किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या दरानं महिनाभराची उंची गाठली आहे. ही परिस्थिती पाहता कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्यांनी खालील 5 गोष्टी लक्षात ठेवाव्या. सीएनबीसीनं याचा आढावा घेतला आहे...
- अमेरिकी फेडच्या बैठकीपूर्वी, डॉलर इंडेक्समध्ये तेजी परतत आहे. सलग 6 दिवस 100च्या खाली राहिल्यानंतर काल 0.50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. त्यानंतर डॉलर इंडेक्स 100.68वर पोहोचला. आजही डॉलर निर्देशांक 100.54च्या पातळीवर पोहोचला आहे. खरं तर यूएस फेडची बैठक 25-26 जुलै रोजी होणार आहे. जुलैमध्ये दर 0.25 टक्के वाढतील असं बाजार गृहीत धरत आहे. यासोबतच बाजाराला असंही वाटतं, की नोव्हेंबरपर्यंत दर 5.41 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात आणि मे 2024पर्यंत दर 5 टक्क्यांच्या खाली येण्याची अपेक्षा नाही. यूएसमध्ये, 10 आणि 30 वर्षांचे रोखे उत्पन्न 4 टक्क्यांच्या जवळ आहे. 5 वर्षांचे रोखे उत्पन्न 4 टक्क्यांच्या वर आहे आणि 2 वर्षांचं उत्पन्न सुमारे 5 टक्के आहे.
- डॉलरच्या वाढीचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसून येत आहे. कोमेक्सवर सोनं 2 महिन्यांच्या उंचीवरून घसरलं आहे. काल 1987 डॉलर ओलांडलेलं सोने आज 1970 डॉलरवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, सलग 6 दिवस 25 डॉलरच्या वर व्यवहार करणारी चांदी आज 25 डॉलरच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळालं. केवळ यूएसमध्येच नाही, तर युरोप आणि यूकेमध्येही दर वाढण्याची अपेक्षा बाजाराला आहे. यूएस फेड 26 जुलैला ईसीबी 27 जुलै आणि बीओई 3 ऑगस्ट रोजी दर वाढीची घोषणा करू शकतं. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी चीनच्या पावलांवरही बाजाराची नजर आहे. कारण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते चीन ही सोन्याची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
- कच्च्या तेलात सलग दुसऱ्या दिवशी वाढ सुरू आहे. ब्रेंट अजूनही 80 डॉलरच्या वर आहे, तर डब्लूटीआयदेखील सलग तिसऱ्या दिवशी 76 डॉलरच्या वर आहे. ऑगस्टपासून पुरवठा कमी होण्याची अपेक्षा भाव आणखी घसरण्यापासून रोखत आहेत. 2023च्या पहिल्या 6 महिन्यांत चीनच्या कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ झाली आहे. चीननं दररोज एकूण 11.4 दशलक्ष बॅरल आयात केलं आहे. यामध्ये दररोज 26 लाख बॅरल फक्त रशियातून आयात केलं जातं. चीनची क्रूड आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 12 टक्क्यांनी जास्त आहे. कोरोना काळापेक्षा 15.3 टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल, असा अंदाज बाजार व्यक्त करत आहे.
- रशियाच्या ब्लॅक सी ग्रेन डीलमधून माघार घेतल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे भाव सातत्यानं वाढत आहेत. काल गव्हाच्या किंमतीने 442 डॉलर/बुशेल पार केलं आहे. तर किंमत 2023च्या 59.06 डॉलर/बुशेलच्या उच्चांकापासून 7 टक्के खाली आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही तर भाव आणखी वाढू शकतात, असा बाजाराचा अंदाज आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. मलेशियामध्ये पाम तेल 4070 रिंगिटच्या जवळपास आहे. मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर मागणीत तेजी असणार आहे. अशा स्थितीत मागणी आणि पुरवठ्यातल्या वाढत्या दरीमुळे किंमतीत वाढ होताना दिसत आहे.