Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Wheat and Atta Price: ग्राहकांना दिलासा! गहू, आट्याचे भाव कमी होणार, लवकरच केंद्र सरकारकडून उपाययोजना

मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात गहू आणि आट्याचे दर वाढत आहेत. यावर केंद्र सरकारकडून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. गहू आट्याचे दर कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अन्न खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे.

Read More

Budget 2023: मेड इन इंडिया योजनेला आयात शुल्कामुळे खिळ, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय माल टिकेना

भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग हब बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी उद्योगांसाठी विविध योजनाही राबवण्यात येत आहेत. मात्र, वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल स्टील, पॉलिमर्स, कॉपर, अॅल्युमिनियमची विविध सुट्या भागांवरील आयात शुल्क जास्त असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

Read More

Budget 2023:अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणांची शक्यता, 500 वंदे भारत ट्रेन, 35 हायड्रोज इंधनावरील गाड्या मिळणार?

आगामी बजेटमध्ये रेल्वे खात्याला 1.9 लाख कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्या, डबे अत्याधुनिक करण्याचे नियोजन रेल्वे खात्याने आखले आहे. तसेच रेल्वे मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन आणि 2030 पर्यंत झिरो कार्बन एमिशनचे लक्ष्य रेल्वे खात्याने ठेवले आहे. त्यानुसार विकासासाठी मोठा निधी देण्यात येईल.

Read More

Work life Balance: नोकरी सोडण्यामागे सर्वात मोठं कारण 'वर्क लाइफ बॅनल्स'; 2022 मधील जॉब मार्केटचं धक्कादायक वास्तव

2022 वर्षात नोकरी सोडण्यामागील सर्वात मोठी सात कारणे समोर आली आहेत. वर्क लाइफ बॅलन्स साधण्यातील अडचणींमुळे सुमारे 34 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. त्यासोबतच इतर अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे कर्मचारी नोकरी सोडून जातो.

Read More

Phonepe कंपनीने तब्बल 35 कोटी डॉलर निधी उभारला, भविष्यात पेमेंट अॅपमध्ये सुरू करणार 'या' सुविधा

फोनपे ही कंपनी गुगल पे ची कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या दोन्ही कंपन्यांकडून नवनवीन फिचर्स ग्राहकांसाठी आणली जातात. एकूण युपीआय व्यवहारांच्या संख्येमध्ये फोनपे प्रथम क्रमांकावर आहे. फोनपे कंपनीचे भविष्यातील अनेक प्लॅन्स असून त्यासाठी 35 कोटी अमेरिकन डॉलर इतका निधी उभा केला आहे.

Read More

IT Companies layoffs 2023: मार्क झुकेरबर्गकडून इतर कंपन्यांनी धडा घ्यावा; कर्मचारी कपात करताना "या" चुका केल्या मान्य

मागील काही महिन्यांपासून जगभरातील आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. मात्र, कर्मचारी कपात करताना कंपन्यांनी केलेल्या चुका मान्य केल्या नाहीत. उलट फक्त मंदी आणि जागतिक परिस्थितीचे कारण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला मार्क झुकेरबर्ग यांची मेटा कंपनी अपवाद ठरली.

Read More

Electrical Material Market In India: इलेक्ट्रिकल मटेरियल बाजारपेठेच्या वाढीसाठी 'हे' घटक ठरतील फायदेशीर

Electrical Material Market In India:भारतीय विद्युत क्षेत्रात कमालीची उत्पादन क्षमता असणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत. देशात वाढती इलेक्ट्रिक उपकरणांची (Electric Equipment's) वाढती गरज व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यास अनेक कंपन्यांना यश मिळाले आहे.

Read More

GoMechanic: गोमेकॅनिकच्या खात्यांमध्ये आर्थिक त्रुटी, होणार फॉरेन्सिक ऑडिट!

GoMechanic: गोमेकॅनिक कंपनीने नुकतेच त्यांच्या 70 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन (lays off 70% staff) काढून टाकले आहे. ज्यामुळे कंपनीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे, यावेळी कंपनीचे को-फाऊंडर अमित भसीन यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांच्या लेख्याजोख्यात गडबड झाल्याचे मान्य केले आहे, तर नेमके प्रकरण काय ते समजून घेऊयात.

Read More

Maharashtra in Davos WEF: महाराष्ट्रात 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार, चंद्रपूर-गडचिरोलीत बडे प्रकल्प येणार

Maharashtra in Davos WEF: स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राची घोडदौड सुरुच आहे. दावोसमध्य आतापर्यंत अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी इच्छा दर्शवली आहे. ही परिषद 20 जानेवारी 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

Read More

Microsoft Lay Off: आता मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात layoff, कंपनी 11 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

Microsoft Lay Off : यावर्षीही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा हंगाम सुरू झाला आहे. आता मायक्रोसॉफ्ट ही जगातील नंबर वन सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाणारी कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.

Read More

Maharashtra in WEF Davos: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा धमाका, 45900 कोटींचे गुंतवणूक करार झाले

Maharashtra in WEF Davos: स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये (Davos) 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्रासाठी पहिल्याच दिवशी मोठी कामगिरी केली. राज्यामध्ये सुमारे 45900 कोटींचे गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

Read More

Maharashtra's biggest Windmill Project: तब्बल ५२८ मेगा वॅट क्षमतेसह हा ठरतो महाराष्ट्रतील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प

Maharashtra's biggest Windmill Project: महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात ब्राह्मणवेल ता. साक्री येथे असून पारख ॲग्रो इंडस्ट्रीजने विकसित केला आहे. ज्याची सुझलॉन (Suzlon) कंपनी देखभाल करते. भल्या मोठ्या पंखांच्या मदतीने हा ५२८ मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प विद्युत निर्मिती करतो ज्यास पवनचक्की (Windmill) असे देखील म्हणतात.

Read More