• 09 Feb, 2023 08:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023:अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणांची शक्यता, 500 वंदे भारत ट्रेन, 35 हायड्रोज इंधनावरील गाड्या मिळणार?

Indian railway

आगामी बजेटमध्ये रेल्वे खात्याला 1.9 लाख कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्या, डबे अत्याधुनिक करण्याचे नियोजन रेल्वे खात्याने आखले आहे. तसेच रेल्वे मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन आणि 2030 पर्यंत झिरो कार्बन एमिशनचे लक्ष्य रेल्वे खात्याने ठेवले आहे. त्यानुसार विकासासाठी मोठा निधी देण्यात येईल.

अवघ्या दोन आठवड्यांच्या आत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचा भर पायाभूत सुविधांवर असू शकतो. भारतीय रेल्वेच्या विकासासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 500 वंदे भारत गाड्या, अत्याधुनिक हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या 35 गाड्या आणि प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या विकासासाठी मोठा निधी मिळू शकतो.

मालवाहतुकीसाठी 4 हजार नवीन डबे (4 thousand new coaches for freight train)

चारचाकी आणि इतर मोठ्या वाहनांची रेल्वेद्वारे वाहतूक करण्यासाठी 4 हजार नवीन डिझाइनचे डबे आणि 58,000 वॅगन्स बनवण्यासाठी मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन वर्षात हे सगळं काम पूर्ण केलं जाऊ शकत, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

रेल्वे खात्याला मिळणार 1.9 लाख कोटी (1.9 lakh core for railway development)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी बजेटमध्ये रेल्वे खात्याला 1.9 लाख कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्या, डबे अत्याधुनिक करण्याचे नियोजन रेल्वे खात्याने आखले आहे. तसेच रेल्वे मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन आणि 2030 पर्यंत झिरो कार्बन एमिशनचे लक्ष्य रेल्वे खात्याने ठेवले आहे. त्यानुसार विकासासाठी मोठा निधी देण्यात येईल.

हायड्रोजन इंधनावर धावणार रेल्वे (Hydrogen fueled railway)

हेरिटेज स्थळांना जोडणाऱ्या आठ मार्गांवरील रेल्वे गाड्या हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या असतील, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलिकडेच म्हटले आहे. दार्जिलिंग, नीलगिरी, काल्का-शिमला आणि कांग्रा व्हॅली मार्गावर धावणाऱ्या गाड्या हायड्रोजन इंधनावर असतील, असे रेल्वे मंत्र्यांनी म्हटले होते. वारसा स्थळांच्या या भागात कोणतेही प्रदूषण होऊ नये म्हणून हायड्रोनवर चालणाऱ्या रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी बजेटमध्ये निधी मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वे डब्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान( New Technology in Railway coaches)

500 वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी जवळपास 65 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक हजार डब्यांमध्ये वॉटर-मिस्टवर आधारित अग्निशामक यंत्रणा बसवण्याचा विचार करत आहे. याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होणार आहे. अर्थसंकल्पात न्यू ऐज रोलिंग स्टॉक व्यतिरिक्त, 100 व्हिस्टाडोम कोच बनविण्याची योजना आणि प्रीमियर ट्रेनच्या 1,000 डब्यांचे नूतनीकरण (refurbishment) करण्यात येऊ शकते.