महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात ब्राह्मणवेल ता. साक्री येथे असून पारख ॲग्रो इंडस्ट्रीजने विकसित केला आहे. ज्याची सुझलॉन (Suzlon) कंपनी देखभाल करते. भल्या मोठ्या पंखांच्या मदतीने हा 528 मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प विद्युत निर्मिती करतो ज्यास पवनचक्की (Windmill) असे देखील म्हणतात.
70 कीलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेची एक पवनचक्की
या प्रकल्पाची प्रत्येकी वीजनिर्मती क्षमता 70 किलोवॅट इतकी आहे. यात 1250 पवनचक्की आहेत. या प्रकल्पात काही उंच टॉवर्सची उभारणी केली गेली आहे जे धुळे शहरापासून पासून 40 किलोमीटर उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यापर्यंत पसरलेले आहेत. पवनऊर्जा ही नैसर्गिक देण असली तरी तिची निर्मिती करणे तितके सोपे नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून एक पवनचक्की उभारली जाते गुंतवणूकदार इतकी गुंतवणूक करतांना विचार करतात यामुळे ऊर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत प्रोत्साहन म्हणून सबशिडी दिली जाते. परंतु यासाठी येणारा खर्च हा कोटींच्या घरात असल्याकारणाने सौर उर्जेप्रमाणे सामान्य नागरिक यास बसवू शकत नाही. सध्या या प्रकल्पात भारतातील नामांकित व्यवसायिक, क्रिकेटर, सिनेकलाकार यांनी गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून यशस्वीरित्या हा प्रकल्प वाटचाल करत आहे.
या भौगोलिक कारणामुळे वीजनिर्मितीसाठी या जागेची निवड
धुळे जिल्ह्याला लागून असलेली सातपुडा पर्वतरांग आणि नैऋत्त्य व वायव्ये कडून येणारे बारमाही वारे हे या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यात गुंतवणुकदार तसेच शासनाने मदत केल्यास या प्रकल्पाची क्षमता 1000 मेगावॅटपर्यंत वाढू शकते. धुळे जिल्ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणांचे वातावरण देखील विजनिर्मितीसाठी उपयुक्त आहे. त्यात सातारा, सांगली आणि पाचगणी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची तामिळनाडूनंतर 4098MW सह भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे