जसं एखादा व्यक्ती अधाशीपणे आणि हावरटासारखा खातो अगदी त्याच पद्धतीने कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्यांनी नोकर भरती केली होती. अचानक वाढलेलं काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज या बलाढ्य कंपन्यांनी जास्त पैसे खर्च करून पूर्ण केली. फेसबुक आणि त्यांची सह कंपनी मेटा, अॅमेझॉन, गुगल, शेअरचॅट, सेल्सफोर्स, ट्विटर , बेटर, मायक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपन्यांसह इतर हजारो कंपन्यांनी तात्पुरता विचार करून नोकरभरती केली. मात्र, आता या सर्व कंपन्यांनी नफा होत नसल्याने खर्चात कपात करण्यसाठी कर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मार्क झुकेरबर्ग यांची कर्मचारी कपात करताना केलेल्या चुका मान्य केल्या. तशा चुका इतर कंपन्यांनी मान्य केल्या नाहीत.
कर्मचारी कपात करताना जागतिक मंदी, कमी व्यवसाय आणि वाढता खर्च हे नोकर कपात करण्यामागील कारण असल्याचे बहुसंख्य कंपन्यांनी म्हटले. तसेच हा निर्णय कर्मचाऱ्यांना कंपनीच्या प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितला नाही. थोडक्यात, त्यांच्याकडून झालेल्या चुकांची जबाबदारी घेतली नाही.
कर्मचारी कपातीची जबाबदारी घेतली (Mark Zuckerburg took responsibility of layoff in meta)
मार्क झुकेरबर्ग यांनी मात्र, कर्मचारी कपात करताना इतर कोणत्याही खात्यावर हा निर्णय न ढकलता सर्वस्वी जबाबदारी स्वत: घेतली. तसेच का कर्मचारी कपात करावी लागत आहे, यामध्ये इतर सर्व कारणांसोबत त्यांनी स्वत: कंपनीचे निर्णय घेताना काय चुका केल्या हे सुद्धा सांगितले. असे क्वचितच इतर कंपन्यांनी केले. मेटा कंपनीतील अनेक प्रकल्पांचे नियोजन, घेतलेले निर्णय कसे राबवायचे आणि निर्णय घेण्याची वेळ यामध्ये केलेली गफलत मार्क झुकेरबर्ग यांनी मान्य केली. येत्या काळात कंपनीकडे पैसे कसे येणार आणि कसे जाणार याबाबत समजून सांगत कंपनीच्या वाढीसाठी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकावे लागेल, सांगितले.
रणनीती आखताना चुकल्याचे केले मान्य( Zuckerburg accepts miscalculation in decisions)
कंपनीची रणनीती आखताना केलेली चुका मनाचा मोठेपणा दाखवत झुकेरबर्ग यांनी मान्य केल्या. त्यामुळे येत्या काळात विस्कटलेली घडी पुन्हा नीट होईल, याची शक्यता जास्त आहे. या ऊलट इतर कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय का घेतला, यामागे फक्त बाह्य स्थितीचेच कारण दिले. अस्थिर आर्थिक स्थितीमुळे कंपनीला तोटा होत आहे, अशा परिस्थितीत कर्मचारी कपात करणं गरजेचं असल्याचे म्हटले. मात्र, कंपनीने निर्णय घेताना केलेल्या चुका मान्य केल्या नाहीत. यातील अनेक कंपन्यांच्या प्रमुखांवर गुंतवणूकदारांचा दबावही होता. त्यामुळे त्यांच्या कर्मचारी कपातीतून नेतृत्व गुण नसल्याचे दिसून येते.
ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय पूर्णपणे ह्युमन रिसोर्स विभागावर ढकलून दिला. कपात कशी करायची याबाबत त्यांनी कोणताही निर्णय स्वत: घेतला नाही. ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांनी अंमलात आणलेल्या अनेक निर्णयांवर टीका झाली.