भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी फोनपे ने मार्केटमधून मोठा निधी उभा केला आहे. फोनपे ही कंपनी गुगल पेमेंटची कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या दोन्ही कंपन्यांकडून नवनवीन फिचर्स ग्राहकांसाठी आणली जातात. एकूण युपीआय व्यवहारांच्या संख्येमध्ये फोनपे प्रथम क्रमांकावर आहे. कंपनीचे भविष्यातील अनेक प्लॅन्स असून त्यासाठी 35 कोटी अमेरिकन डॉलर इतका निधी उभा केला आहे. ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी कंपनी जनलर अटलांटिककडून फोनपे ने हा निधी मिळवला आहे. 12 बिलियन डॉलरच्या मुल्यांकनावर कंपनीने हा निधी उभारला आहे.
दोन वर्षात फोन पे च्या मुल्यांकनात दुप्पट वाढ( Phonepe valuation doubled in two years span)
जानेवारी २०२३ पासून कंपनीने फंड उभारणीस सुरुवात केली असून आणखी अनेक गुंतवणूकदार कंपनीशी भविष्यात जोडले जाणार आहेत. यामध्ये भारतीय गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. अमेरिकन बलाढ्य रिटेल जायंट वॉलमार्टकडे फोन पे कंपनीची मालकी आहे. डिसेंबर 2020 साली कंपनीचे मुल्यांकन साडेपाच बिलियन कोटी होते. मात्र, यामध्ये मागील दोन वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. फ्लिपकार्ट कंपनीची मालकी सुद्धा वॉलमार्ट कंपनीकडे आहे. फोन पे आणि फ्लिपकार्ट यांना मागील काही दिवसांपूर्वी पूर्ण पणे वेगळे करण्यात आल्यानंतर फंड उभा करण्यात आला आहे.
फोन पे कोणत्या सुविधांसाठी पैसे खर्च करणार? (Where will Phonepe invest money)
ऑनलाईन पेमेंटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा जसे की डेटा सेंटर्स, अॅप द्वारे देण्यात येणाऱ्या गुंतवणूक, विमा, वेल्थ मॅनेजमेंट, कर्ज या सुविधा आणखी वाढवण्यासाठी कंपनीकडून खर्च करण्यात येणार आहे. सध्या फोन पे कडून अॅपमध्ये विविध प्रकारचे बिल्स पेमेंट, विमा तिकीट बुकिंग, शॉपिंगच्या सुविधा देण्यात येत आहेत. मात्र, गुंतवणुकीसंबंधीत आणखी पर्याय ग्राहकांसाठी फोन पे घेऊन येणार आहे. जनरल अटलांटिक या गुंतवणूक कंपनीने बैजू, अनअॅकॅडमी आणि इतर भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
गुगलशी टक्कर (Phonepe competition with Google pay)
फोन पे या कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी गुगल पेमेंट्स सुविधा असून दोघांमध्ये बाजारातील सर्वात जास्त वाटा मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. एकून युपीआय व्यवहारांच्या बाबतीत फोन ने पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतेच गुगल ने ट्रान्झॅक्शन फेल होण्याच्या अडचणीवर स्मार्ट राऊटिंग हे फिचर लाँच केले आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यासाठी दुसरा युपीआय आयडी तयार करू शकता. एका युपीआय आयडीवरुन पेमेंट करण्यास अडचण होत असेल तर दुसरा आयडी ग्राहकांना पेमेंट करताना वापरता येईल. ही सुविधा फोन पे कडे उपलब्ध नाही.