भारतीय विद्युत क्षेत्रात कमालीची उत्पादन क्षमता असणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत. देशात वाढती इलेक्ट्रिक उपकरणांची वाढती गरज व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यास अनेक कंपन्यांना यश मिळाले आहे. सध्या सुमारे 60 ते 70% उत्पादन क्षमतेसह या उपकरणांचे मार्केट 2021 साली 30 बिलियन डॉलर्स इतके होते.
विद्युत क्षेत्रात काही विदेशी कंपन्यांची एंट्री होत आहे. या कंपन्या भारतीय उत्पादनांना तांत्रिक सहकार्य करत आहे. यासाठी आवश्यक व विकसित तंत्रज्ञान या कंपन्यांकडून निर्माण केले जात आहे. बहुतांश क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाबरोबरच कार्य करण्याची क्षमता या यंत्रांमध्ये आहे. यामुळे मनुष्यबळाचा वापर योग्य ठिकाणी होत आहे.
उत्पादन क्षमता वाढल्यामुळे देशातील विविध ठिकाणांपर्यंत उत्पादित केलेली वस्तु किंवा सेवेचा पुरवठा करण्यासाठी एक साखळी तयार करणे गरजेचे आहे. या साखळीत रोजगार निर्मिती होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ऊर्जा क्षेत्रातील वाढ, गुंतवणूक आणि सरकारकडून या क्षेत्राला समर्थन मिळत आहे. कोविड काळात या उद्योगाला मंदीचा सामना करावा लागला होता. कोविडनंतर या उद्योगात 30% वाढ झाली.