Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Union Budget 2023: अर्थसंकल्पात कोण - कोणते मुद्दे मांडले जातात?

Union Budget 2023: येत्या काहीच दिवसात भारताचा अर्थसंकल्प संसदेत, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. त्या अर्थसंकल्पात कोणकोणते मुद्दे मांडले जाणार आहेत, तसेच बहिखात्यात कोणत्या मुद्द्यांवर लिहिलेले असते. याबाबतची थोडक्यात माहिती आपल्याला पुढे वाचता येईल.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पानंतर चर्चेविना सरकार देऊ शकते निधी प्रस्तावाला परवानगी, पण कसे?

Budget 2023, Facts and Trivia about Guillotine: लोकसभा आणि राज्यसभेतून अर्थसंकल्प मंजूर होणे आवश्यक असते, मात्र अशा परिस्थितीत सरकारने अर्थसंकल्पात प्रत्येक मंत्रालयासाठी अनुदान असते, परंतु अधिवेशनाच्या मर्यादित कालावधीत प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणे शक्य नाही. अशा स्थितीत ज्या मागण्यांवर चर्चा होऊ शकत नाही त्या चर्चेविना मंजूर केल्या जातात. ज्याला संसदीय कामकाजाच्या भाषेत 'गिलोटिन' म्हणतात. याबद्द

Read More

Budget 2023: Income Tax Slab म्हणजे काय?

Budget 2023: 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मधील टॅक्स स्लॅबबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकांना कर स्लॅबमध्ये अधिक सूट मिळण्याची अपेक्षा आहे, जाणून घेऊया इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे काय?

Read More

Thalinomics : 'थालिनॉमिक्स' म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी हे जाणणे महत्त्वाचे का आहे?

बहुतेक लोकांना आर्थिक सर्वेक्षण (Economic survey) समजत नाही. यामुळेच आर्थिक पाहणीचा अहवाल समजून घेण्याऐवजी सर्वसामान्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण आता अर्थ मंत्रालयाने अशी अनोखी पद्धत आणली आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते समजू शकेल.

Read More

Budget 2023 Expectation: लोककल्याणकारी योजनांवर सरकार खर्च वाढवू शकते, होऊ शकतात या सुधारणा!

रेटिंग एजन्सीने (Rating Agency) म्हटले आहे की विद्यमान केंद्र सरकार त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन लोककल्याणकारी कार्यक्रमांना भरभरून आर्थिक मदत करू शकतात. पायाभूत सुविधा वाढवणे, उत्पादनावरील भांडवली खर्च वाढवणे, कौशल्य विकास आणि उत्पादकता वाढवणे, आर्थिक एकात्मता आणि हवामान बदल यावर येणाऱ्या अर्थसंकल्पात भर दिला जाईल असे म्हटले गेले आहे.

Read More

Budget 2023 expectation: रोजगारासाठी बजेटमधून तरुणांना काय मिळणार? फक्त डिग्री नको तर कौशल्य हवे

शिक्षण पूर्ण केलेले लाखो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. जर बजेटमधून तरुणांच्या कौशल्य विकासासाठी निधी मिळाला नाही तर रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होणार नाही. फक्त डिग्री नको तर तरुणांना प्रात्यक्षिकावर आधारीत व्यावसायिक कौशल्य मिळणे खूप गरजेचं झालं आहे.

Read More

Union Budget 2023 DLSS Announcement: बजेटमध्ये होणार DLSS योजनांची घोषणा?

Union Budget 2023 DLSS Announcement:इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्सच्या (ELSS) धर्तीवर डेब्ट लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (DLSS) सुरू करण्याची मागणी म्युच्युअल फंड कंपन्यांनी सरकारकडे केली आहे. बजेट 2023 अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन DLSS गुंतवणूक योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023 Expectation: येत्या अर्थसंकल्पात FD बद्दल होऊ शकते मोठी घोषणा! गुंतवणूकदारांना होऊ शकतो मोठा फायदा

Union Budget 2023 Expectation: नवीन अर्थसंकल्पात करमाफीबाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. बचत योजना (Saving Schemes) आणि एफडीमध्येही (Fix Deposit) नागरिकांना सूट मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बजेट सादर करणार आहेत. आर्थिक नियोजन करण्यासाठी आता अनेक लोक सरसावले आहेत. नव्या अर्थसंकल्पात काय घोषणा होतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

Union Budget 2023 Key Areas to watch: आगामी बजेटमध्ये 'या' 10 गोष्टींवर सरकारचे विशेष लक्ष राहील

Union Budget 2023 Key Areas : पुढल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन भारताचा बजेट सादर करतील. पुढील वर्ष सार्वत्रिक निवडणुका असल्याने सरकारला यंदाचे पूर्ण बजेट सादर करण्याची संधी मिळेल. यात 10 मुख्य गोष्टी सरकारसाठी महत्वाच्या ठरतील.

Read More

Budget 2023 expectations: करदात्याला बजेटकडून काय हवंय? ज्यामुळं त्याच्या कुटुंबाचं बजेट सुधारेल

मागील अनेक वर्षांपासून कर मर्यादेच्या टप्प्यांमध्ये काहीही बदल केला नाही. फक्त 2020-21 च्या बजेटमध्ये न्यू टॅक्स रिजिम लागू केला. मात्र, या टॅक्स रिजीमला नोकरदारांनी जास्त पसंती दिली नाही. सध्या करमुक्त उत्पन्नांची मर्यादा अडीच लाख रुपये आहे. यामध्ये वाढ करुन पाच लाख करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

Union Budget 2023: मीही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेय, बजेटपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे का म्हणाल्या?

काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मीही मध्यमवर्गीय कुटुंबातून आली असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजते, असं म्हटले होते. भारतामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मध्यमवर्गीय गटामध्ये मोडते. या मध्यमवर्गीय गटाला बजेटकडून काय अपेक्षा आहेत? कर आणि महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

Read More

Union Budget 2023 Expectation: टॅक्स स्लॅबपासून नवीन रोजगाराबाबत मध्यमवर्गीयांच्या बजेटमधून काय अपेक्षा आहेत?

Union Budget 2023 Expectation: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण 1 फेब्रवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबपासून नवीन रोजगार निर्मितीबाबत त्या काय घोषणा करणार? याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.

Read More