Budget 2023: 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील टॅक्स स्लॅबबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकांना कर स्लॅबमध्ये अधिक सूट मिळण्याची अपेक्षा आहे. जुन्या टॅक्स स्लॅबनुसार तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. 2.5 लाख ते 5 लाख उत्पन्न असल्यास 5 टक्के कर भरावा लागेल. जेव्हा-जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो, तेव्हा प्राप्तिकर (income tax) स्लॅबची चर्चा तीव्र होते. तर जाणून घेऊया इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे काय?
इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे काय? (What is Income Tax Slab?)
सध्या एक नवीन टॅक्स स्लॅब आणि एक जुना टॅक्स स्लॅब काम करतो, जे तुम्हाला किती लाखांच्या उत्पन्नावर किती कर भरावा लागेल हे सांगते. स्लॅबमुळे ते समजणे आणि आयकर भरणे खूप सोपे जाते. आयकर किती आणि कसा द्यावा लागणार हे दर्शवण्यासाठी मदत वापरला जाणारा स्लॅब म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅब, असे आपण म्हणू शकतो. यासोबतच टॅक्स स्लॅबमध्ये हेही सांगण्यात येते की कोणत्या वयोगटातील लोकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल आणि किती रक्कम करमुक्त असेल. आयकराची रक्कम थेट सरकारच्या खात्यात जाते. उद्योग आणि कंपन्यांनी भरावयाच्या करासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जाते.
नवीन आणि जुने टॅक्स स्लॅब काय आहेत? (What are the new and old tax slabs?)
जुन्या टॅक्स स्लॅबनुसार तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. 2.5 लाख ते 5 लाख उत्पन्न असल्यास 5 टक्के कर भरावा लागेल. यामध्ये देखील जर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळते. नवीन कर स्लॅबनुसार, जर तुमचे उत्पन्न 5 ते 7.50 लाख असेल तर तुम्हाला एकूण 10 टक्के कर भरावा लागेल. याशिवाय 60 ते 80 वयोगटातील व्यक्तींसाठी 3 लाख रुपये आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.
इन्कम | टॅक्स |
2.5 लाखांपर्यंत | 0% |
2.5 ते 5 लाख | 5% |
5 लाख ते 7.5 लाख | 10% |
7.5 लाख ते 10 लाख | 15% |
10 लाख ते 12.5 लाख | 20% |
12.5 लाख ते 15 लाख | 25% |
15 लाख पेक्षा जास्त | 30% |
वेगवेगळ्या उत्पन्न मिळवणाऱ्यांना वेगवेगळा कर भरावा लागतो? (Do different income earners have to pay different taxes?)
टॅक्स स्लॅबद्वारे उत्पन्न निश्चित केले जाते, त्यानंतर त्या आधारावर आयकर (income tax) भरला जातो. जसजसा टॅक्स स्लॅब बदलेल तसतसा त्यावर आकारला जाणारा करही वाढणार आहे. सध्या देशात दोन करप्रणाली आहेत. एक नवीन टॅक्स स्लॅब आणि दुसरा जुना टॅक्स स्लॅब. मागील अर्थसंकल्पात सरकारने जुने टॅक्स स्लॅब रद्द केलेले नाहीत. सरकारने दोन्ही पर्याय दिले आहेत, तुम्ही फक्त कोणत्या टॅक्स स्लॅबने कर भरायचा हे ठरवायचे आहे.