Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Union Budget 2023: उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारे सरकार! राष्ट्रपतींनी केली मोदी सरकारची प्रशंसा

Union Budget 2023: उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू त्यांच्या अभिभाषणात म्हणाल्या. येणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांसाठी, व्यावसायिकांसाठी काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. कोविड संसर्गानंतर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उद्योगक्षेत्राला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Read More

Budget and Market: बजेटच्या दिवशी कसा असेल मार्केटचा मूड? वाचा मागील दहा वर्षातील मार्केटने बजेटला दिलेला प्रतिसाद

Budget and Market: भारताच्या बजेटकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. उद्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

Read More

Union Budget 2023: महिलांच्या सबलीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध -राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात महिलांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला गेला. गेल्या 8 वर्षात सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या आणि त्या यशस्वीरीत्या राबविल्या असेही राष्ट्रपती म्हणाल्या. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे त्यांनी कौतुक केले.

Read More

Budget 2023: नव्या कर प्रणालीतून करदात्यांना सूट मिळाली तर जुनी कर प्रणाली रद्द होणार का?

2014 पासून करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत सरकारने कोणताही बदल केला नाही. तसेच कर वजावटीच्या मर्यादेतही बदल केला नाही. नव्या कर प्रणालीमध्ये बदल करून तिला अधिक आकर्षक करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची चर्चा सुरू आहे. जर तसे झाले तर जुन्या कर प्रणालीचे काय होईल, हा प्रश्न पुढे येतो. सर्वसामान्य नागरिकांना कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे.

Read More

Think Tank Behind Budget 2023: भारताचे बजेट तयार करणारी 'टीम निर्मला सीतारामन' जाणून घ्या

Think Tank Behind Budget 2023: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रातील भाजप सरकारसाठी हा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारत जी-20 देशाच्या समूहाचे अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे यंदाचे बजेट मांडताना सरकारला अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांना खूश करावे लागेल.

Read More

Budget 2022 Highlights: गेल्या वर्षी केंद्र सरकारने बजेटमधून केलेल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

Budget 2022 Highlights: पुढच्या 25 वर्षांत भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 100 वर्षपूर्तीकडे वाटचाल करताना पीएम गतीशक्ती, समावेशक विकास उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण आणि हवामान संबंधी कृती या चार प्राधान्यक्रमांसह विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता.

Read More

Union Budget 2023 Live:राष्ट्रपतींनी मोदी सरकारची पाठ थोपटली, लोककल्याणकारी योजनांचे केले कौतुक

Economic Survey: राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार गरिबांसाठी आणखी काही कल्याणकारी योजना आणू शकतात असे संकेत मिळत आहेत. तसेच आधीपासून सुरु असलेल्या लोककल्याणकारी योजना अधिक सक्षम बनविण्याचा सरकार प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

Union Budget 2023 Live: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu Speech Live) यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहांना पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारच्या मागील आठ वर्षातील कामगिरीचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत 2022-23चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.

Read More

Budget 2023: 2022 च्या बजेटनंतर स्टॉक मार्केटवर काय परिणाम झाला होता?

Stock market: 1 फेब्रुवारी 2022 रोजी, जेव्हा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी होती. सेन्सेक्सला तीन टक्के परतावा मिळाला. तर निफ्टी सुमारे 451 अंकांनी वाढला, म्हणजेच सुमारे 2.5 टक्के परतावा मिळाला. अर्थसंकल्पानंतर रशिया-युक्रेन युद्धाने बाजारातील भावना बिघडवली.

Read More

Budget 2023 Expectations: देशातील व्यापाऱ्यांच्या अर्थमंत्र्यांकडे केल्या 'या' 18 मागण्या!

यंदा सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा स्थितीत अखिल भारतीय व्यापारी महासंघाला (Confederation of All India Traders) यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. याविषयी जाणून घेऊया.

Read More

Budget 2023 Income Tax: बजेट आले की इन्कम टॅक्स कायद्यातील 80C ची चर्चा सर्वाधिक का होते?

Budget 2023 Income Tax: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C (Income Tax Section 80C) हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More

Budget 2023 Expectations: 'वंदे भारत' ट्रेनच्या संख्या वाढणार? महाराष्ट्रात 2 ट्रेनचे लोकार्पण करणार प्रधानमंत्री मोदी

2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे अनेक मागण्या आहेत. सामान्य अर्थसंकल्पासोबत रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्याही सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात.

Read More