Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

What is Budget? अर्थसंकल्प म्हणजे काय?

What is Budget: आज आपण अर्थसंकल्प म्हणजे काय यासोबतच, अर्थसंकल्पाचे प्रकार किती, त्याचे भाग किती आणि महत्त्वाचे म्हणजे तो वाचायचा कसा हे पाहणार आहोत.

Read More

Budget 2023 expectations: गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! सुकन्या समृद्धी योजनेसह अल्पबचत योजनांना बजेटमधून मिळणार प्रोत्साहन

सुकन्या समृद्धी योजना आणि इतर अल्पबचत योजनांना Budget 2023 मधून आणखी सहकार्य मिळणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून अल्पबचत योजनांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, असं अहवालात म्हटले आहे.

Read More

Cryptocurrency: बजेट 2023 मधून डिजिटल चलनाबाबत काय अपेक्षा ठेवता येईल?

Union Budget 2023: 2022च्या बजेटमध्ये क्रिप्टोवर 30 टक्के टॅक्स आणि त्याच्या प्रत्येक ट्रान्सॅक्शनवर 1 टक्के टीडीएस लावण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता आगामी 2023-24 च्या बजेटमध्ये सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read More

Budget 2023 Expectation : स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्याची नोकरदारांची अपेक्षा

Budget 2023 Expectation : वाढत्या महागाईने नोकरदार वर्ग पिचून गेला आहे. नोकरदार वर्गातील बहुतांश करदाते आहेत. आगामी बजेटमध्ये स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा दुपटीने वाढवण्यात यावी, अशी अपेक्षा नोकरदारांनी केली आहे.

Read More

Halwa Ceremony | अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी बनवला जातो हलवा, काय आहे हलवा समारंभाचे महत्व, जाणून घ्या!

Budget 2023: सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ साजरा केला जातो. परंपरेनुसार, अर्थ मंत्रालयात हलवा बनवला जातो. हा हलवा अर्थ मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना खायला दिला जातो. अर्थसंकल्पाच्या कामात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केल्यानंतरच अर्थसंकल्प सादर केला जातो.

Read More

Budget 2023 Expectation: रेल्वेसाठी काय असणार अर्थसंकल्पात? होऊ शकतात 'या' सुधारणा

आगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार रेल्वे बजेट वाढवले जाईल अशी अपेक्षा आहे. सरकार रेल्वेच्या बजेटमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. यापूर्वी अर्थसंकल्पपूर्व बैठकीत रेल्वे बोर्डाने अर्थ मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 25-30 टक्के अधिक निधीची मागणी केली होती. अशा स्थितीत यावेळी सरकार अंदाजपत्रकात रेल्वे मंत्रालयाला सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा निधी देऊ शकते.

Read More

Union Budget 2023: PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार?

देशात PPF चे अनेक खातेधारक आहेत. टॅक्सच्या दृष्टीनेही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अनेक जण करत असतात. याविषयी नेमकी काय मागणी होत आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Union Budget 2023 Fiscal Deficit: अर्थसंकल्पात होऊ शकते काटकसर, सरकार सावध पावले टाकणार

Union Budget 2023 Fiscal Deficit: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. आगामी बजेटकडून सर्वांच्या खूप अपेक्षा असल्या तरी नियंत्रणाबाहेर वाढलेली तूट पाहता सरकारकडून बजेटमध्ये सावध भूमिका घेतली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read More

Budget 2023: चार वर्षात सरकारी कर्जाचं प्रमाण दुपटीपेक्षा जास्त; आणखी 16 लाख कोटी कर्ज घेणार?

आगामी आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये सरकार 16 लाख कोटी इतकं कर्ज घेऊ शकतं, असे रियटर्सने घेतलेल्या जनमत चाचणीतून समोर आले आहे. तसेच पुढील वर्षी मोठ्या राज्यांच्या आणि लोकसभा निवडणुका आहेत, त्याआधी सरकारचा भांडवली खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे.

Read More

Budget 2023: 100 हून अधिक लोकांची टीम तयार करते बजेट, जाणून घ्या कसे बनते बजेट!

Budget 2023: सर्व मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, इतर स्वायत्त संस्था आणि संरक्षण दलांकडून वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक घेतले जाते. कोणत्या विभागाला किंवा मंत्रालयाला किती निधीची गरज आहे, याचा अंदाज घेऊन अर्थसंकल्प तयार केला जातो.

Read More

Budget 2023 MSME Expectation: लहान उद्योगांसाठी फायदेशीर योजना बंद; बजेटकडून MSME क्षेत्राच्या 'या' आहेत अपेक्षा

Budget 2023 MSME Expectation: कोरोनानंतर मोडकळीस आलेले भारतातील लहान उद्योग अद्यापही पूर्णत: सावरले नाहीत. महागाई, वाढत्या कच्च्या मालाच्या किंमती, आयात-निर्यात शुल्क, उत्पादन खर्च आणि स्पर्धा वाढीमुळे या क्षेत्रातील उद्योगांना बजेटकडून अपेक्षा आहेत. मात्र, सरकारने या उद्योगांना फायदेशीर असलेल्या काही योजना बंद केल्यामुळे कंपन्यांचे नुकसान होत आहे.

Read More

Budget 2023: अन्नधान्याची नासाडी कधी थांबेल? कृषी क्षेत्रातील कंपन्यांना बजेटकडून आहेत 'या' अपेक्षा

फळे, भाजीपाला, दूध असे नाशवंत पदार्थ साठवण्यासाठी कोल्ड चैन आणि जलद वाहतुकीची सुविधाही उपलब्ध नाही. जर अन्नाची ही नासाडी थांबणार नसेल तर आपण कितीही विक्रमी उत्पादन घेतले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खासगी क्षेत्रातून गुंतवणूक वाढण्यासाठी बजेटमध्ये ठोस तरतूद असावी, अशी अपेक्षा या क्षेत्रातील कंपन्यांची आहे.

Read More