Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMC Budget 2023 Highlights: मुंबईचा अर्थसंकल्प 52,619.07 कोटी रुपये; मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 14.52 टक्क्यांनी वाढ

LIVE BLOG

MCGM BMC Budget 2023

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी थोड्याच वेळात शिक्षण समितीचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. महापालिकेचे बजेट अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू सादर करतील. (BMC Budget will be table on 4th Feb 2023)

BMC MCGM BUDGET 2023-24 Live: मुंबई महापालिकेच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पाचे थेट सादरीकरण 


देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेचे बजेट (Brihanmumbai Municipal Corporation-BMC) शनिवारी दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केले जाणार आहे. त्रिपुरा, नागालॅंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि गोवा या राज्यांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे. 2022 मध्ये मुंबई महापालिकेत तब्बल 45,949 कोटींचे बजेट सादर करण्यात आले होते. यंदा पालिकेच्या बजेटचा आकडा 50,000 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.

Feb 04, 2023 18:46 IST

BMC MCGM 2023 Updates: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; पालिकेच्या बजेटमध्ये मुंबईकरांवर कोणतीही करवाढ नाही

मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) सादर केलेल्या अर्थसंकल्पात पालिकेने सर्वसामान्यांवर कोणतीही करवाढ केलेली  दिसत नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन मुंबईकरांवर कोणतीही करवाढ केलेली नाही, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन महागाईत दिलासा मिळाला आहे.

Feb 04, 2023 18:18 IST

BMC MCGM 2023 Updates: मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा आणि तिजोरीतून खर्च होणारा निधी

महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा निधी

1-1.png

महापालिकेच्या तिजोरीतून खर्च होणारा निधी

2-2.png
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feb 04, 2023 17:52 IST

BMC MCGM 2023 Live: आरोग्य विभागाकरीता पालिकेकडून अर्थसंकल्पात विशेष तरतूद

मुंबई महापालिकेने कोविड-19 नंतर आरोग्य सुविधांवरील खर्चात वाढ केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6,309.38 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद एकूण अर्थसंकल्पाच्या 12 टक्के इतकी आहे.

bmc-hospital-mumbai.jpg

भगवती रूग्णालयाच्या पुनर्विकासासाठी 110 कोटी रुपये

गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामासाठी 110 कोटी रुपये

एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 95 कोटी रुपये

कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित बांधकामासाठी 75 कोटी रुपये

सायन रुग्णालयाच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी 70 कोटी रुपये

भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिकेच्या रुग्णालयासाठी 60 कोटी रुपये

वान्द्रे येथील भाभा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 53.60 कोटी रुपये

संघर्ष नगर येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या राखीव भुखंडाच्या विकासासाठी 35 कोटी रुपये

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feb 04, 2023 17:43 IST

BMC MCGM 2023 Live: शिक्षण विभागाच्या 2023-24 मधील अर्थसंकल्पीय अंदाज आणि 2022-23 चे सुधारित अंदाज

education-department-in-2023-24-fund-index.jpg
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feb 04, 2023 17:37 IST

BMC MCGM 2023 Live: पालिकेच्या 2023-24च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

सागरी किनारा रस्ता प्रकल्प 3545 कोटी रुपये

प्रथामिक शिक्षणासाठी 3347 कोटी रुपये

मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी 2792 कोटी रुपये

रस्त्यांच्या सुधारणांसाठी 2825 कोटी रुपये

रस्त्यांवरील पुलांकरीता तरतूद 2100 कोटी रुपये

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांकरीता 2527 कोटी रुपये

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 366.50 कोटी रुपये

आश्रय योजनेकरीता 1125 कोटी रुपये

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी 1060 कोटी रुपये

राणीच्या बागेचे (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) आधुनिकीकरणासाठी 133.93 कोटी रुपये

देवनार पशूवधगृहाच्या आधुनिकीकरणाकरीता 13.69 कोटी रुपये

Feb 04, 2023 17:31 IST

BMC MCGM 2023 Live: महापालिका शिक्षणाचे बजेट 3347.13 कोटी; मागील वर्षाच्या तुलनेत 23 कोटींनी घट

महापालिकेने मागच्या वर्षी शिक्षणावर मोठी तरतूद केली होती. पण यावर्षी पालिकेने शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्प 23 कोटींनी कमी केला आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 3,370.24 कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता. तर 2023-24 या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत 23 कोटींनी घट केली असून तो 3,347.13 कोटी रुपये अंदाजित केला आहे.

Feb 04, 2023 17:21 IST

BMC MCGM 2023 Live: मुंबई पालिकेच्या मालमत्ता करात मोठी घट

मुंबई महापालिकेने 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून (Property Tax) 7,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण पालिकेच्या सुधारित अंदाजानुसार 4,800 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. पण प्रत्यक्षात मात्र 31 डिसेंबर, 2022 पर्यंत पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून 3,174.456 कोटी रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात 2,200 कोटी रुपये इतकी घट झाली. 

Feb 04, 2023 17:11 IST

BMC MCGM 2023 Live: पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 50 हजार कोटींचे बजेट - आयुक्त

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भांडवली खर्चाचे प्रमाण 50% हून अधिक

ठेवींचे व्याजदर वाढले...पालिकेला मिळाले 277 कोटींचे अतिरिक्त व्याज…

कोस्टल रोडसाठी 3545 कोटींची तरतूद; गेल्या बजेटमध्ये 2650 कोटींची तरतूद केली होती - पालिका आयुक्त

Feb 04, 2023 17:07 IST

BMC MCGM Budget 2023: पालिकेच्या अर्थसंकल्पात 14.52 टक्क्यांनी वाढ; उत्पन्नात मात्र 1855 कोटींची घट

BMC MCGM Budget 2023: मुंबई महापालिकेचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) सकाळी आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना सादर करण्यात आला. 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 52,619.07 कोटी इतका प्रस्तावित आहे. 2022-23चा अर्थसंकल्प 45,949.21 कोटी रुपये इतका होता. त्यात यावर्षी 14.52 टक्क्यांनी वाढ केली आहे.पण पालिकेच्या महसुलात 2022-23 मध्ये 1855.98 कोटी रुपयांची घट झाली आहे.

2022-23 या आर्थिक वर्षाकरीता 30,743.61 कोटी रुपयांच्या महसुलाचा अंदाज प्रस्तावित केला होता. त्यात सुधारणा होऊन तो 28,887.63 कोटी रुपये करण्यात आला. तर 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मुंबई महापालिकेने 33,290 कोटी रुपये महसुल उत्पन्न मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. 2022-23 च्या तुलनेत यावर्षीचा अंदाज 2546.42 कोटीने जास्त आहे.

2023-24 आर्थिक वर्षात महापालिका शिक्षणाचे बजेट 3347.13 कोटी

तर 2022-23 या आर्थिक वर्षातील शिक्षण विभागाचे बजेट सुधारित अंदाजानुसार 23 कोटींनी कमी

बेस्ट प्रशासनासाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी 800 कोटींची तरतूद

Feb 04, 2023 16:35 IST

BMC MCGM Budget Live: मुंबई महापालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प 52,619.07 कोटी रुपये; 'महामनी'चा अंदाज तंतोतंत

देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेचे बजेट (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) येत्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केले जाणार आहे. वर्ष 2022 मध्ये मुंबई महापालिकेत तब्बल 45949 कोटींचे बजेट सादर करण्यात आले होते. यंदा बजेटचा आकडा 50000 कोटींवर जाण्याचा अंदाज ‘महामनी’च्या बातमीतून  व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार  2023-24 चा महापालिकेचा अर्थसंकल्प 52,619 कोटी रुपये इतका आहे. (BMC Budget 2023 may cross 50000 crore mark)

 

Feb 04, 2023 16:27 IST

BMC MCGM 2023 Live: बजेट दहा मिनिटांत महापालिका वेबसाईटवर अपलोड होईल - आयुक्त

BMC MCGM 2023 Live: मुंबई महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त सचिव अश्विनी भिडे यांनी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आयुक्तांना सादर केला. 

सदर बजेटची कॉपी 10 मिनिटांत पालिकेच्या वेबसाईटवर अपलोड केली जाईल. त्यानंतर 11.30 वाजता पत्रकार परिषद होईल - डॉ. इक्बाल सिंह चहल

Feb 04, 2023 16:14 IST

BMC MCGM Budget 2023: शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर

whatsapp-image-2023-02-04-at-104144-am.jpeg
 

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शिक्षण समितीचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feb 04, 2023 00:30 IST

BMC Budget 2023 : मुंबईत सुशोभीकरणासाठी खर्च होतात कोट्यवधी रुपये, प्रत्येक वॉर्डसाठी 30 कोटींचा निधी

bmc-budget-2023-highlights.jpg

BMC Budget 2023 : मुंबई हे केवळ भारताची आर्थिक राजधानीच नाही जगातील एक मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत होणाऱ्या घटनांची जगभरात दखल घेतली जाते. त्यामुळे या शहरात जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जातात. अधिक वाचा...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feb 04, 2023 00:19 IST

BMC Budget 2023: महापालिका आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर देणार

BMC Budget 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. यावेळचा हा अर्थसंकल्प कोणत्याही पक्षाचा असणार नाही. काही महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पण प्रशासकाच्या नेमणुकीतून राज्य सरकार मुंबई महापालिकेवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावेळच्या मुंबईच्या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर दिला जाण्याची दाट शक्यता आहे. अधिक वाचा…

Feb 03, 2023 21:49 IST

BMC Corporator Salary : देशातील श्रीमंत महापालिकेतील नगरसेवकांना मिळते दरमहा इतके वेतन

मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. या महापालिकेच्या नगरसेवकांना विकास निधी म्हणून कोट्यावधी रुपये पालिका प्रशासनाकडून मंजुर केले जातात. नगरसेवकाला दरवर्षी 60 लाख रुपये आणि एक कोटी रुपये विकास कामांसाठी मंजूर केले जातात. नगरसेवकांना महिन्याला किमान 50000 रुपयांचे वेतन मिळते. 

Feb 03, 2023 21:49 IST

BMC Budget 2023 Income Sources of BMC : मुंबई महापालिका जवळपास 25 ते 30 हजार कोटींचे उत्पन्न मिळते

पालिकेसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. यात सर्वाधिक उत्पन्न प्रॉपर्टी टॅक्स, डेव्हलपमेंट फी, जीएसटी परतावा, पाणीपट्टी, गुंतवणुकीवरील व्याज उत्पन्न, एफएसआय विक्री करुन मिळणारा महसूल अशा विविध मार्गाने पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवते. पालिका या स्त्रोतातून 25 ते 30 हजार कोटींचे उत्पन्न मिळवते…वाचा सविस्तर

Feb 03, 2023 19:27 IST

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेच्या बजेटबाबत या गोष्टी माहित आहेत का?

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचे बजेट शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत. 

 

 

Feb 03, 2023 18:50 IST

BMC Budget 2023: निवडणूक लांबल्याने 38 वर्षांत पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत बजेटसंदर्भात 'ही' गोष्ट घडणार

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. मात्र कोरोना संकट आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असल्याने महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली… सविस्तर वाचा

Feb 03, 2023 18:20 IST

BMC Budget 2022 Highlights: मागच्या वर्षी बीएमसीचा अर्थसंकल्प 45,949 कोटी रुपयांचा होता

bmc-2.jpg

BMC budget 2022 Highlights: गेल्या वर्षी म्हणजे 2022-23चा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 45,949 कोटी रुपयांचा होता. त्या अर्थसंकल्पाला महापालिकेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी होती. पण यावेळी पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे 2023-24 च्या अर्थसंकल्प कितीचा असणार आणि त्यातून मुंबईकरांना काय-काय मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे… अधिक वाचा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Feb 03, 2023 17:31 IST

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेचे महाकाय बजेट! यंदा 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडणार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता शिक्षण समितीचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. महापालिकेचे बजेट (MCGM BUDGET 2023) अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू सादर करतील. (BMC Budget will be table on 4th Feb 2023)… अधिक वाचा                                                              

Load more