Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Budget? अर्थसंकल्प म्हणजे काय?

Union Budget 2023

What is Budget: आज आपण अर्थसंकल्प म्हणजे काय यासोबतच, अर्थसंकल्पाचे प्रकार किती, त्याचे भाग किती आणि महत्त्वाचे म्हणजे तो वाचायचा कसा हे पाहणार आहोत.

Union Budget 2023: अर्थसंकल्पाला इंग्रजी भाषेत बजेट (Budget) असे म्हणतात. आता बजेट हा शब्द सध्या इतका परवलीचा झाला आहे की, तो सर्रास आपल्या कानावर पडत असतो. डिजिटल मिडिया आणि सोशल मिडियावरील सततच्या अपडेटमुळे कदाचित असेल. बजेट हे घराचे असते, तसेच देशाचे ही असते. म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारी मुले असो किंवा घर सांभाळणारी गृहिणी असो, पती-पत्नी असो किंवा देशाचा जमा-खर्च सांभाळणारा अर्थमंत्री असो, या सगळ्यांनाच बजेटची भारी चिंता असते. कारण ते सगळ्यांना प्रत्यक्ष मॅनेज करावे लागते. त्यासाठी काटकसर करावी लागते. बचत करावी लागते. जमा-खर्चाचा मेळ साधावा लागतो. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागतात. या सगळ्या प्रक्रियेला इंग्रजीत बजेट आणि मराठीत अर्थसंकल्प (Budget) म्हणतात. पण सध्या अर्थसंकल्प या शब्दाचा अर्थ आपण, केंद्र आणि राज्य सरकार मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिविशेनात (Union Budget 2023-24) काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार किंवा टॅक्स कितीपर्यंत वाढणार इथपर्यंतच सिमित केला आहे.

बजेट शब्दाचा इतिहास

असो, मुळात बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील बजेत (bougette) म्हणजे चामड्याचे पाकीट या शब्दापासून आला आहे. तसे पाहायला गेले तर या शब्दाचा जमा आणि खर्चाशी काहीच संबंध नाही. संबंध लावायचाच असेल तर पूर्वी अर्थसंकल्प सादर करण्याची किंवा वाचण्याची कागदपत्रे ही चामड्याच्या बॅगेतून (Indian Budget History) अर्थमंत्री आणत होते. 2019 पासून ही प्रथा ही बदलण्यात आली. पूर्वीच्या चामड्याच्या बॅगेची जागा आता भारतीय बही खाता (bahi khata)ने घेतली आहे. आणि ता त्याही पुढे जात डिजिटल इंडिया (digital india)च्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प टॅबवर वाचण्यात आला.

अर्थसंकल्प, वार्षिक ताळेबंद, जमा-खर्च, वार्षिक विवरणपत्र म्हणजेच बजेट

एका वाक्यात सांगायचे झाले म्हणजे, आर्थिक वर्षाचे ताळेबंद, म्हणजेच जमा – खर्चाच्या हिशोबाला अर्थसंकल्प किंवा बजेट म्हणतात. आपल्याकडे केंद्र सरकार संसदेत आणि राज्य सरकार विधिमंडळात दरवर्षी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्प मांडून त्यानुसार वर्षभर जमा-खर्च करण्याची परवानगी सभागृहाकडून घेतात. आपल्या भारतीय संविधानात राज्य कारभार कसा करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले आहे आणि काही नियम ही आखून दिले आहेत. देशाचा किंवा राज्याचा आर्थिक कारभार कसा करावा, यावरही भाष्य केले आहे. पण संविधानात कोठेही अर्थसंकल्प असा शब्द वापरलेला दिसून येत नाही. त्याऐवजी वार्षिक वित्तविषयक विवरणपत्र असा उल्लेख दिसून येतो. यालाच आपण बजेट किंवा अर्थसंकल्प म्हणतो.

आर्थिक वर्ष म्हणजे काय?

आपल्याकडे चालत आलेल्या परंपरेनुसार आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जातो. आर्थिक वर्ष म्हणजे, एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून पुढील वर्षाच्या मार्च महिन्यातील 31 तारखेपर्यंतचा कालावधी. केंद्र आणि राज्य सरकार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात अर्थसंकल्प सभागृहात सादर करतात. अर्थसंकल्पाचे 3 प्रमुख भाग असतात. एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोकलेखा . याबाबत आपण पुढील भागात अधिक तपशिलाने जाणून घेणार आहोत.

अर्थसंकल्पाचे प्रकार 

शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget) – या अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च कमी असतो त्याला शिलकीचा अर्थसंकल्प म्हणतात.
समतोल अर्थसंकल्प (Balanced Budget) – या अर्थसंकल्पात सरकारचे खर्च आणि उत्पन्न दोन्ही समान असतात. त्याला समतोल अर्थसंकल्प म्हणतात.
तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget) – या अर्थसंकल्पात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो. त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. 

अर्थसंकल्पाची मांडणी / वाचन

आपल्याकडे अर्थसंकल्प मांडताना 3 भागांमध्ये मांडला जातो किंवा वाचला जातो. म्हणजेच एकाच पुस्तकात त्याची 3 भागांमध्ये रचना केलेली असते. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे.

budget-page-2022-23-1.jpg
महाराष्ट्र सरकारच्या 2022-23 अर्थसंकप्लीय प्रकाशनातील जमा - खर्चाचे पान.

अर्थसंकल्पीय अंदाज (Budget Estimate), यात येणाऱ्या वर्षात होणारी जमा रक्कम आणि त्यावर आधारित होणाऱ्या खर्चाचा अंदाज दिलेला असतो.

सुधारित अंदाज (Revised Estimate), म्हणजे मागच्या वर्षी मांडलेल्या अंदाजित अर्थसंकल्पाचे यावर्षीचे सुधारित अंदाज सरकार मांडतं.

प्रत्यक्ष रकमा (Actuals), या भागात दोन वर्षांपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पातील प्रत्यक्ष जमा-खर्चाचे आकडे दिले जातात. 

यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना, 2022-23 या आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प, त्यासोबत मागील वर्षाचा म्हणजेच 2021-22 या वर्षीचा सुधारित अंदाज आणि 2020-21 या वर्षातील प्रत्यक्ष रकमा दिल्या आहेत.

budget baNNER_REVISED

IMAGE SOURCE - https://bit.ly/3FcY2p8