Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5 New Year Resolutions: या 5 संकल्पाने करा नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन, बचतीसोबतच गुंतवणुकीची सवय आवश्यक

Financial year resolutions

Financial year resolutions: आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2024 सुरू झाले आहे. प्रत्येकाने या वर्षाचे वित्त नियोजन केले असेल. नवीन वर्षासाठी अनेकजण बचतीचे पर्याय शोधतात. आज आपण जाणून घेऊया या आर्थिक वर्षात 5 महत्वाचे संकल्प ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सुरळीत होईल.

आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2024 सुरू झाले आहे. प्रत्येकाने या वर्षाचे वित्त नियोजन केले असेल. नवीन वर्षासाठी अनेकजण बचतीचे पर्याय शोधतात. आज आपण जाणून घेऊया या आर्थिक वर्षात 5 महत्वाचे संकल्प ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सुरळीत होईल. (5 new year resolutions for managing your money in 2023)

खर्चाचे नियोजन करा (Plan Your Expenses)

अनावश्यक खर्चावर नियंत्रणासाठी तुम्हाला खर्चाचे नियोजन करावे लागेल. यासाठी तुम्ही पेमेंट अॅप्सचा वापर करू शकता. नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिल्यास तुम्हाला खर्चाची वेळोवेळी माहिती मिळेल. चैनीच्या वस्तू, खाद्यपदार्थ व मनोरंजन यात पैसे खर्च करत असताना तुम्हाला बचत व खर्च यातील ताळमेळ साधता येते आणि होणाऱ्या खर्चाची जाणीव होते.  

खर्चावर अंकुश ठेवा (Control Expenses)

पैसे वाचवण्यासाठी तुम्ही दर महिन्याला मासिक खर्चाचा आढावा घ्यावा लागेल आणि अनावश्यक खर्च कसा टाळता येईल याचा अंदाज घेता येईल. एक व्यक्ती सामान्यपणे त्याच्या  कमाईच्या 38% ते 40% खर्च कुटुंबावर करते. त्यात अनेकदा आकस्मित खर्च देखील येतो. 

नवीन आर्थिक उद्दिष्टे तयार करा (Create New Financial Goals)

भविष्यातील खर्च आणि गुंतवणुकीच्या आधारावर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करावे लागेल. तुमची आर्थिक उद्दिष्टे शक्य तितक्या लवकर सेट करा. उदाहरणार्थ, "क्रेडिट कार्डचे  कर्ज वाढले असेल तर हे कर्ज फेडण्यासाठी वर्षाच्या अखेरीस तुम्हाला ठराविक रक्कम जमा करावी लागेल".

आपत्कालीन स्थितीसाठी पैशांचे नियोजन करा (Plan Money For Emergencies)

वैद्यकीय खर्च, नोकरी गमावणे, घराची डागडुजी किंवा दुरुस्ती यासारखे अनपेक्षित खर्च उद्भवल्यास तयार असणे गरजेचे आहे, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बाजूला ठेवून आपत्कालीन परिस्थितीसाठी पैशांची जमवाजमाव करू शकता.

योजनेत गुंतवणूक करा (Invest In Plan)

व्यक्तिगत आर्थिक नियोजन करण्यासाठी अनेक सरकारी व निमसरकारी योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मॅच्युरीटी कालावधीनंतर तुम्हाला घसघशीत परतावा मिळतो. यामुळे आवश्यक परिस्थितीत या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. 

(डिसक्लेमर: गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)