Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 Live: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला

LIVE BLOG

Union Budget 2023

Image Source : www.deccanchronicle.com

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu Speech Live) यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहांना पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. केंद्र सरकारच्या मागील आठ वर्षातील कामगिरीचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत 2022-23चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.

Union Budget 2023: भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे लाईव्ह भाषण

बजेटचे काउंटडाउन सुरु झाले आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदा बजेटकडून सर्वच घटकांच्या खूप अपेक्षा आहेत. यातील किती अपेक्षा सरकार पूर्ण करणार हे 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी स्पष्ट होईल.                                

Jan 31, 2023 22:55 IST

Union Budget 2023-24 | Pre-Budget Session | अर्थसंकल्पीय आधिवेशन 2023 | Mahamoney

उद्या सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांकडून केंद्राच्या बजेटमधील गोष्टींचे अंदाज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला सनदी लेखापाल संतोष कदम आणि आर्थिक घडामोडींचे विश्लेषक देविदास तुळजापूर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

 

अर्थसंकल्पीय आधिवेशन 2023-2024 बजेट पूर्व चर्चा | श्री. संतोष कदम (सीए) आणि श्री. देविदास तुळजापूरकर (आर्थिक तज्ज्ञ) (mahamoney.com)

 

 

Jan 31, 2023 19:23 IST

Budget 2023 Live: आर्थिक पाहणी 2022-23 च्या अहवालावर मुख्य आर्थिक सल्लागारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Budget 2023 Live: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी 2022-23 अहवाल सादर केला. या आर्थिक पाहणी 2022-23 अहवालावर मुख्य आर्थिक सल्लागार 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.                                

Jan 31, 2023 18:34 IST

Budget 2023 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी थोड्याच वेळापूर्वी आर्थिक पाहणी 2022-23 अहवाल सादर केला. त्यानंतर संसदेची अधिवेशन बुधवार सकाळी 11 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आले. उद्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाईल.                                          

Jan 31, 2023 17:22 IST

Economic Survey 2023: आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल म्हणजे काय?

Economic Survey: केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी, 2023 रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman, Finance Minister, Govt of India) या हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी त्याच्या एक दिवस अगोदर अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल संसदेत सादर केला जातो. हा आर्थिक अहवाल का महत्त्वाचा असतो. हे आपण आज जाणून घेणार आहोत.  

अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी म्हणजे 31 जानेवारीला संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022-23 या आर्थिक वर्षाचा असेल. या अहवालात गेल्या वर्षभरातील आकडेवारी दिलेली असते. 

Jan 31, 2023 17:05 IST

Union Budget 2023 Live : आर्थिक पाहणीपूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे.आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. मात्र त्यापूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला.

 

Jan 31, 2023 16:29 IST

Union Budget Live PM Narendra Modi : भारताच्या बजेटकडे जगाचे लक्ष, सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या बजेटकडे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. (PM Narendra Modi Address Media Before Budget Session) देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. आज स्त्री शक्तीचा सन्मान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. सामान्य भारतीयांच्या अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन पूर्ण करतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

Jan 31, 2023 16:01 IST

Union Budget Live Economic Survey: थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन इकोनॉमिक सर्व्हे सादर करणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज 31 जानेवारी 2023 पासून दिल्लीत सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. मागील वर्षभरात अर्थव्यवस्थेची कामगिरीचा आढावा आर्थिक पाहणी अहवालातून घेतला जाणार आहे.  सकाळी 11 वाजता सीतारामन लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. 

Jan 31, 2023 00:57 IST

Union Budget 2023 : रिअल इस्टेट क्षेत्राला बजेटमध्ये काय मिळणार? वाचा सविस्तर

देशांतर्गत रिअल इस्टेट क्षेत्रासाठी 2022 हे वर्ष खूप चांगले गेले. घरांच्या मागणीत वाढ झाली. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जिथे गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चांगले गेले. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला (Budget Expectations Real Estate Sector) चालना मिळण्याची शक्यता आहे.                                                                              

Budget 2023 Expectations 'These' 18 demands of the country's traders to the Finance Minister! T1
 

Jan 30, 2023 21:23 IST

Union Budget Live : विमा क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून करणार मोठी घोषणा

विमा क्षेत्रालाही (Insurance) या अर्थसंकल्पातून मोठ्या आशा आहेत. विशेषतः आरोग्य, गृह विम्यावर आकारल्या जाणार्‍या 18 टक्के जीएसटीमध्ये कपातीची वाट पाहत आहे. सरकारने आरोग्य विम्यावर लावण्यात आलेल्या जीएसटीमध्ये कपात केल्यास त्यांच्यासाठी मोठा दिलासा मिळू शकतो, असे विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पात आरोग्य विमा (Health Insurance) आणि जीवन विम्यावरील (Life Insurance) जीएसटी दर 5 टक्क्यांपर्यंत कमी केल्यास लोकांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.                                                                            

Jan 30, 2023 21:08 IST

Budget 2023 Live : यंदाही संसदेत पेपरलेस बजेट सादर होणार

केंद्र सरकारने डिजिटल इकॉनॉमीप्रमाणेच अर्थसकंल्प सादर करण्याच्या पद्धतीत देखील मागील काही वर्षात सुधारणा केली आहे. वर्ष 2021 पासून अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत डिजिटल स्वरुपात बजेट सादर करतात. लेदर बॅग मग बहीखाता बुक आणि आता टॅबलेटमधून सादर होणारे बजेट असा अर्थसंकल्पाचा प्रवास राहिला आहे. यंदाही 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पेपरलेस बजेट सादर करणार आहेत.                                                                            

Jan 27, 2023 23:36 IST

Union Budget Live : शेतकऱ्यांचे बजेटकडे लक्ष, सरकारकडून होणार मोठ्या घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मध्ये लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनाची घोषणा केली जाऊ शकते, कारण गेल्या काही वर्षांत केवळ हवामानातील आव्हानेच वाढलेली नाहीत, तर शेतीचा खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत कृषी योजना अधिक प्रभावी करण्यासाठी आणि या योजना देशातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात.                                                                        

Budget 2023 The country once had to pay 31 percent tax on an annual income of Rs 15,001 T1-1
                                                                           

Load more