बहुतेक लोकांना आर्थिक सर्वेक्षण समजत नाही. यामुळेच आर्थिक पाहणीचा अहवाल समजून घेण्याऐवजी सर्वसामान्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण आता अर्थ मंत्रालयाने अशी अनोखी पद्धत आणली आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते समजू शकेल. दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या (Budget 2023) आधी देशाचे आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे, त्यानुसार देशाचा आर्थिक सर्वेक्षण 31 जानेवारीला सादर होणार आहे. अर्थ मंत्रालयाने प्रथमच आर्थिक सर्वेक्षणात 'थालिनॉमिक्स' समाविष्ट केले आहे. याच्या मदतीने तुम्ही महागाई वाढली की कमी झाली हे सहज समजू शकाल. चला तर मग जाणून घेऊया थालिनॉमिक्स म्हणजे काय? (What is Thalinomics?) आणि त्यामुळे महागाईची पातळी कशी ओळखली जाते?
थालिनॉमिक्स म्हणजे काय?
थालिनॉमिक्स ही एक पद्धत आहे ज्याद्वारे भारतातील फूड अफॉर्डेबिलीटी ओळखली जाते. म्हणजेच एका भारतीयाला एक थाळी खाण्यासाठी किती खर्च करावा लागतो? हे थालिनॉमिक्समधून कळते. अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. खाण्या-पिण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सामान्य जनतेवर होतो. थालिनॉमिक्स म्हणजे थालीसाठी सामान्य माणूस किती पैसे मोजतो? हे मोजण्याचा एक प्रयत्न आहे.
आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करतो?
अर्थसंकल्पापूर्वी इकॉनॉमिक सर्वेक्षण तयार केले जाते, त्याला आर्थिक सर्वेक्षण असेही म्हणतात. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग आहे, ज्याला इकॉनॉमिक अफेअर्स म्हणतात. या अंतर्गत इकॉनॉमिक डिव्हिजन असतं. हा आर्थिक विभाग मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजेच CEA च्या देखरेखीखाली आर्थिक सर्वेक्षण तयार करतो.
प्लेटच्या किमती कशा ठरवल्या जातात?
इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज थालिनॉमिक्सच्या किमतींची माहिती देण्यात आली आहे. कोणती प्लेट महाग झाली आहे? आणि कोणती प्लेट स्वस्त आहे? भारतातील फूड प्लेटच्या अर्थशास्त्राच्या (थालिनॉमिक्सच्या) आधारे केलेल्या समीक्षेत पौष्टिक थाळीच्या किमतीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. या अर्थशास्त्राच्या माध्यमातून भारतातील सामान्य माणसाने एका थाळीसाठी किती खर्च केला? याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो.