Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Business Idea: ऋतू कोणताही असो, 'हा' व्यवसाय तेजीतच! महिन्याला करून देईल 1 लाखांची कमाई

Business Idea: बिझनेस करण्याचा विचार तुमच्या मनात असेल तर एक चांगली आयडिया आम्ही घेऊन आलो आहोत. या व्यवसायातून बंपर कमाई तर करता येतेच. मात्र हिवाळा, उन्हाळा पावसाळा अशा कोणत्याही ऋतूंचा परिणाम या व्यवसायावर होत नाही तर तो कायम हिट ठरतो.

Read More

Tomato Price : टोमॅटोचे भाव लवकरच कमी होतील; केंद्र सरकारचे आश्वासन

देशातील काही बाजारपेठेत टोमॅटोचे दर 120 ते 160 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यामुळे सरकार विरोधात जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील टोमॅटोच्या वाढत्या किमती लवकरच कमी होतील, असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे.

Read More

Inflation in Bangladesh : बांगलादेशात महागाईचा भडका; राहणीमानाच्या खर्चात लक्षणीय वाढ

बांगलादेशात मागील दशकभरातील सर्वोच्च मासिक चलनवाढीचा दर नोंदवला गेला आहे. मे महिन्यात बांगलादेशातील महागाईचा (Inflation in Bangladesh) दर 9.94% होता. बांगलादेश सांख्यिकी ब्युरो (BBS) यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली होती. जून महिन्यातही यामध्ये फारसा बदल दिसून आलेला नाही. परिणामी बांगलादेशात अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किंमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

Read More

E-Saras: महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंची आता थेट ऑनलाइन विक्री

दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत बचत गटातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Digital India या अभियानाचा भाग म्हणून भारतीय हस्तकला, कलाकुसर यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read More

Vegetable price Hike: टोमॅटोनंतर आता हिरवी मिरची आणि आल्याचे दर कडाडले

टोमॅटोने ग्राहकांना झटका दिल्यानंतर आता आले आणि हिरव्या मिरचीचे किरकोळ बाजारातील दर कडाडले आहेत. देशभरात दरवाढ होत असून काही राज्यात 350 रुपये किलोपर्यंत हिरव्या मिरचीचे दर गेले आहेत. पावसाळ्यात भाजीपाल्यांचे दर खाली येतात. मात्र, यंदा दरवाढ पाहायला मिळत आहे.

Read More

Frontier Mail: देशातली पहिली एसी ट्रेन कधी सुरू झाली माहीत आहे? थंड करण्यासाठी होत होता बर्फाचा वापर

Frontier Mail: भारतीय रेल्वे सध्या जनरल डब्यांसह एसी, स्लीपर आणि चेअर कार कोच असलेल्या ट्रेन चालवते. मात्र ही एसी ट्रेन कधी सुरू झाली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तसंच ती कोठून धावली? त्यात आणखी कोण प्रवास करू शकेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ...

Read More

Land survey : जमिनीची मोजणी करायची आहे? जाणून घ्या किती येतो खर्च !

जर एखाद्या व्यक्तीस नवीन जमीन खरेदी करायची असल्यास किंवा स्वत:ची जमीन विकायची असल्यास त्याचे अचूक क्षेत्र काढण्यासाठी देखील सरकारी मोजणी (Land survey) करण्याचा विचार केला जातो. या परिस्थितीत शेतकऱ्याला भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षकाकडे मोजणीसाठी अर्ज करता येतो. यासाठी शासकीय नियमानुसार किती शुल्क आकारले जाते त्यासाठी कसा अर्ज करायचा याची माहिती आपण जाणून घेऊयात..

Read More

Hurun India Report: भारतातील 'या' गुंतवणूकदारांच्या कंपन्या बनू शकतात युनिकॉर्न; यापैकी एक आहे शार्क टॅंक इंडियाचा जज

Hurun India Report: एएसके प्रायव्हेट वेल्थ हुरून इंडियाने 147 स्टार्टअप कंपन्यांवर आधारित एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामधील काही स्टार्टअप भविष्यात युनिकॉर्न बनणार आहेत. या युनिकॉर्न कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टॉप 5 गुंतवणूकदारांबद्दल माहिती करून घेऊयात. यापैकी एक गुंतवणूकदार हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा असून तो शार्क टॅंक इंडियाचा जज आहे.

Read More

Monsoon Travel Preparations : पावसाळी पर्यटनासाठी कसे कराल खर्चाचे नियोजन; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

पावसाळ्यात पर्यटन करायला अनेकांना आवडते. हिरवागार निसर्ग, उंचावरून कोसळणारे धबधबे, रंगबेरंगी फुलांनी नटलेला विस्तीर्ण प्रदेश, निसर्गाने मुक्तहस्ताने बहाल केलेले हे सौंदर्य सर्वांनाच आकर्षित करते. पावसाळी सहलीला (Monsoon Tours) जाणे हा एक आनंददायी अनुभव असू शकतो. परंतु, अशा आनंदाशी तडजोड न करता आणि खिशालाही परवडणारे आर्थिक नियोजन करणे केव्हाही सुज्ञपणाचे ठरते.

Read More

Startups in India: देशातले 51 स्टार्टअप्स बनू शकतात युनिकॉर्न, कोणकोणत्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश?

Startups in India: येणारं वर्ष भारतातल्या स्टार्टअपसाठी चांगलं असणार आहे. पुढच्या तीन वर्षांत 51 हाय-ग्रोथ असणाऱ्या स्टार्ट-अपचं मूल्यांकन 500 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलरदरम्यान असण्याची शक्यता आहे. आस्क प्रायव्हेट वेल्थ हुरून इंडिया फ्यूचर यूनिकॉर्न इंडेक्स 2023च्या (ASK Private Wealth Hurun India Future Unicorn Index 2023) रिपोर्टनुसार या 51 स्टार्टअप्सनी 9.6 अब्ज डॉलर निधी उभारला आहे.

Read More

PF Withdrawal: उमंग अ‍ॅपवरून कसे काढायचे पीएफचे पैसे? जाणून घ्या

UMANG App चा वापर करून तुम्हाला अगदी सहजपणे ईपीएफओ (EPFO) संबंधित माहिती जाणून घेता येते. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट करणे, तसेच तुम्हाला पीएफमधील रक्कम देखील काढण्यासाठी या अॅपवरून अर्ज दाखल करता येतो.

Read More

Instant Pan Card : तुम्हालाही झटपट पॅनकार्ड काढता येईल; तेही मोफत

झटपट ई-पॅन(Instant E-pan card ) सेवा अशा सर्व वैयक्तिक करदात्यांना उपलब्ध आहे. हे पॅन कार्ड आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून प्राप्त करता येते. ज्यांना कायम खाते क्रमांक (पॅन)अद्याप दिलेला नाही. परंतु त्यांच्याकडे आधार क्रमांक आहे. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर आहे. तसेच तुम्ही 10 मिनिटांच्या आत मोफत ई- पॅन कार्ड (E_PAN)मिळवू शकता.

Read More