Monsoon travel tips : पावसाळ्यात पर्यटन करायला प्रत्येकालाच आवडते. हिरवागार निसर्ग, उंचावरून कोसळणारे धबधबे, रंगबेरंगी फुलांनी नटलेला विस्तीर्ण प्रदेश थोडक्यात निसर्गाने मुक्त हस्ताने बहाल केलेले हे सौदर्य सर्वांनाच आकर्षित करते.पावसाळी सहलीला जाणे हा एक आनंददायी अनुभव असू शकतो. परंतु, अशा आनंदाशी तडजोड न करता आणि खिशालाही परवडणारे आर्थिक नियोजन करणे केव्हाही सुज्ञपणाचे ठरते. आजच्या या लेखात, आपण तुम्हाला अशा पावसाळी सहली साठी कशाप्रकारे खर्चाचे नियोजन करता येईल. त्याबाबतच्या काही टिप्स (Monsoon travel tips) देणार आहोत. ज्यामुळे योग्य खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या सहलीचा आनंद लुटता येईल.
कोणत्याही पर्यटनस्थळी जायचे म्हंटले ही सर्वात आधी प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे खर्च किती येईल. त्यामुळे आपण पर्यटन पॅकेज, प्रवास खर्च, राहण्यासाठी येणारा खर्च, जेवणाची सोय, स्थानिक वाहतूक सुविधा आणि अतिरिक्त आर्थिक बाबींसह पावसाळी पर्यटन कशाप्रकारे आर्थिकदृष्ट्या परवडणारे होईल याचे पूर्व नियोजन करणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आपण पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला खर्चाचे नियोजन करण्यास मदत होईल.
Table of contents [Show]
तपशीलवार बजेट तयार करा-
पावसाळी ट्रीपला जाण्यापूर्वी तु्म्ही खर्चाचे तपशीलवार बजेट तयार करणे बचतिच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही प्रेक्षणीय स्थळाची निवड झाल्यानंतर तुमच्या प्रवासाची काळजीपूर्वक योजना करा. तुम्हाला ज्या ठिकाणी भेटी द्यायच्या आहेत त्या ठिकाणांनाच प्राधान्य द्या आणि त्यानुसार तुमचे बजेट तयार करा. यामध्ये वाहतूक, निवास, जेवण, प्रेक्षणीय स्थळे आणि कोणत्याही अतिरिक्त क्रियाकलापांसह तुमच्या अपेक्षित खर्चाची रूपरेषा देणारा तपशीलवार बजेट तयार करा. प्रत्येक श्रेणीसाठी विशिष्ट रक्कम गृहित धरा. त्यावेळी तुमच्या खर्चाचे नियोजन हे एकूण उपलब्ध बजेटमध्ये समाविष्ट होईल याची खात्री करा. तुमच्या खर्चाचे परिक्षण करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार नियोजन करण्यासाठी बजेटिंग अॅप्स किंवा स्प्रेडशीटचा वापरा.
चांगले पर्यटन पॅकेजेस शोधा
आपल्या खर्चाची आणि उत्पन्नाचा अंदाज दुसरा कोणी लावू शकत नाही. कारण आपले बजेट फक्त आपल्यालाच माहिती असते. पावसाळी पर्यटनासाठी जात असाल तर सर्वात आधी तुम्हाला कोणत्या ठिकाणाला भेट द्यायची आहे. कोणते पर्यटनस्थळ पावसाळी सहलीसाठी अधिक समाधानकारक आहे. त्याचा शोध घ्या आणि निश्चित करा. तसेच अनेक टूर्स ऑपरेटकडून वेगवेगळे पॅकेज देतात. त्यामुळे अशा संस्थाची माहिती घेऊन खर्चाच्या बाबतीत तुलनामत्क पडताळणी करा. ते कधीही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वाजवी दरात वाहतूक, निवास आणि प्रेक्षणीय स्थळांचा समावेश असलेले पॅकेज पहा. किमतींची तुलना करा. यासाठी ग्राहकांच्या समाधानाचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले प्रतिष्ठित टूर ऑपरेटर निवडा. पॅकेज निवडताना अनावश्यक अॅड-ऑन टाळा आणि तुमच्या आवडीनिवडी आणि बजेटला अनुरूपच पॅकेजेस निवडा. काही पॅकेजेस ग्रुप डिस्काउंट किंवा लवकर बुकिंग फायदे देऊ शकतात.
ऑफ-सीझन प्रवासाची निवड करा-
पावसाळ्यात प्रवास करणे ऑफ-सीझन मानले जाते. मात्र, पावसाळी सहल पावसाळ्यात काढली नाही तर मग मजा कसली! पावसाळा प्रवासासाठी ऑफ सिझन असला तरी तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरतो, कारण त्याकाळात तुम्हाला हॉटेल्स, विमान प्रवास, इत्यादी सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकते. तसेच सुट्टीचा दिवस टाळून पर्यटनासाठी नियोजन करा.कारण या काळात किमती अधिक किफायतशीर असतात. तसेच आगाऊ बुकिंग सवलत आणि प्रमोशनल ऑफरचा लाभ घेण्यासाठी अधिकची माहिती मिळवून राहण्याचे, प्रवासाचे नियोजन आणि बुकिंग करा.
स्थानिकांकडून मार्गदर्शन घ्या-
कोणत्याही ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी जाल तिथे तुम्ही स्थानिकांकडून माहिती घेण्यासाठी कसलाही संकोच बाळगू नका. त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही, तुमची कमी खर्चामध्ये राहण्याची, खाण्याची आणि प्रवासाची सोय होण्यास खूप मदत होते. तसेच काही वेळा होणारी आर्थिक लुबाडणूक टाळता येते.
परवडणारी निवास व्यवस्था
गेस्टहाऊस, होमस्टे किंवा बजेट हॉटेल यांसारख्या बजेटला-अनुकूल अशा निवासस्थानांमध्ये राहण्याचा विचार करा. हे पर्याय लक्झरी रिसॉर्ट्सच्या किमतीच्या तुलनेत अगदी कमी खर्चात आरामदायी निवासाची सुविधा देऊ शकतात.याव्यतिरिक्त, पावसाळ्यात सवलत देणारी निवास व्यवस्था पहा.किमतींची तुलना करण्यासाठी आणि सर्वोत्तम डील शोधण्यासाठी ऑनलाइन ट्रॅव्हल वेबसाइट, प्लॅटफॉर्मची माहिती शोधा. तसेच विविध हॉटेल्सच्या वेबसाइट तपासून पाहा. तुमची राहण्याची जागा निवडताना स्वच्छता, सुरक्षितता आणि तुमच्या इच्छित ठिकाणांपासून जवळ असेल याला प्राधान्य द्या.
खाण्या-पिण्याच्या खर्चात बचत करा-
ज्यावेळी तुम्ही पावसाळी पर्यटनासाठी जाता त्यावेळी तिथे खाण्याच्या खर्चात बचत करण्यासाठी, परवडणाऱ्या किमतीत अस्सल आणि चविष्ठ जेवण देणाऱ्या स्थानिक भोजनालयाची निवड करा. लोकप्रिय पर्यटन स्थळांमधील पर्यटक रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे टाळा, कारण ते बरेचदा महाग असतात. त्यापेक्षा स्ट्रीट फूड स्टॉल्स पहा. अथवा पर्यंटनस्थळी बहुतांश ठिकाणी खानावळीची सोय असते, इथे तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद मिळू शकतो. या व्यतिरिक्त, पर्यटन स्थळांवर जादा किमतीच्या वस्तू खरेदी करणे टाळण्यासाठी आपल्या सहलीदरम्यान स्नॅक्स आणि पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवण्याचा विचार करा.
अतिरिक्त आर्थिक विचार-
प्रवास विमा- हा अतिरिक्त खर्च वाटत असला तरी, अनपेक्षित आणीबाणीसाठी प्रवासी विम्यात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. हे ट्रिप रद् करणे, वैद्यकीय आणीबाणी किंवा हरवलेल्या वस्तूंच्या बाबतीत आर्थिक संरक्षण प्रदान करते. सर्वात योग्य आणि किफायतशीर पर्याय शोधण्यासाठी विविध विमा योजनांची माहिती घ्या तुलना करा आणि त्या पर्यांयाचाही विचार करा.
दैनिक खर्च मर्यादा सेट करा- शॉपिंग, साहसी अॅक्टिव्हिटी आणि इतर विविध खर्चासाठी दैनिक खर्च मर्यादा ठरवा. बजेटला चिकटून राहिल्याने तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास आणि तुमच्या प्रवासादरम्यान जास्त खर्च टाळण्यास मदत होईल. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी रोख रक्कम बाळगा, छोट्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरण्यापासून सावध रहा. कारण काही ठिकाणी कार्ड स्वीकारले जात नाहीत किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.
शेवटी, स्मार्ट आर्थिक नियोजन आणि खर्चात बचत करण्याच्या धोरणांसाठी महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटन स्थळे तुम्हाला एक समाधानकारक पर्याय ठरू शकतात