Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vegetable price Hike: टोमॅटोनंतर आता हिरवी मिरची आणि आल्याचे दर कडाडले

Vegetable Rates

टोमॅटोने ग्राहकांना झटका दिल्यानंतर आता आले आणि हिरव्या मिरचीचे किरकोळ बाजारातील दर कडाडले आहेत. देशभरात दरवाढ होत असून काही राज्यात 350 रुपये किलोपर्यंत हिरव्या मिरचीचे दर गेले आहेत. पावसाळ्यात भाजीपाल्यांचे दर खाली येतात. मात्र, यंदा दरवाढ पाहायला मिळत आहे.

Vegetable price Hike: मागील काही दिवसांपासून देशभरात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. टोमॅटोचे दर 100 रुपयांवर गेल्यानंतर आता आले (Ginger Price hike) आणि हिरव्या मिरचीने (Green chilly prices) ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. देशातील काही भागात हिरवी मिरची आणि आल्याच्या किंमती प्रति किलो 350 रुपयापर्यंत गेल्याची माहिती पुढे येत आहे.

आवक घटल्याने दरवाढ

देशभरातील किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचे दर वर जात असल्याचे दिसून येत आहे. (Green Chilly price Hike) कोलकाता शहरात हिरवी मिरची आणि आल्याचे दर 350 रुपयापर्यंत पोहचले आहेत. चेन्नई मार्केटमध्येही दर वाढत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून बाजारातील मालाची आवक घटल्याने अचानक दरवाढ झाल्याचे समोर येत आहे. मान्सून पावसाच्या प्रभावामुळेही बाजारातील मालाची आवक घटली आहे.

आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील मिरचीचे उत्पादन घटले

आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात हिरव्या मिरचीचे सर्वाधिक उत्पादन होते. (Vegetable price Hike) तेथून अनेक राज्यात मिरचीचा पुरवठा केला जातो. मात्र, या दोन्ही राज्यात होणारे उत्पादन आणि पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले आहेत. मागील वर्षी कर्नाटकात हिरव्या मिरचीच्या पिकात शेतकऱ्यांना मोठा तोटा झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी दुसऱ्या पिकाकडे मोर्चा वळवला. मिरचीच्या लागवडीत घट झाल्याने उत्पादनही रोडावले आहे. 

महाराष्ट्रात हिरव्या मिरचीचे दर किती?

राज्यात हिरव्या मिरचीचे दर किरकोळ बाजारात 120 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. जूनच्या मध्यावधीपासून हिरव्या मिरचीचे दर वाढण्यास सुरूवात झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात खराब हवामानामुळे मिरची पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. पुढील एक ते दोन महिने दर जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हिरवी मिरची आणि आल्यासह हिरव्या वाटाण्याच्या किंमतीही वाढत आहेत. (Green Peas Price Hike) हिरव्या वाटाण्याचे दर प्रति किलो 280 किलोपर्यंत गेले आहेत. मात्र, वाटाण्याची मागणी खूप जास्त नसल्याने बाजारावर जास्त परिणाम होणार नाही.

मागील आठवड्यात ग्राहक विभागाच्या आकडेवारीनुसार देशात टोमॅटोचे सरासरी दर 56 रुपये होते. तर काही भागात सर्वाधिक दर प्रति किलो 123 रुपये दर होते. दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ बाजारातील दर प्रति किलो 80 रुपये होते. तर कोलकाता आणि चेन्नई शहरात अनुक्रमे प्रतिकिलो 105 आणि 88 रुपये होते.

भारतात भाववाढ होत असताना बांगलादेशला हिरव्या मिरचीची निर्यात

भारतामध्ये हिरव्या मिरचीचे दर वाढत असताना भारतातून बांगलादेशला 104 टन हिरवी मिरची निर्यात केल्याची बातमी समोर येत आहे. The business standard या बांगलादेशच्या वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे. भारतामध्ये दरवाढ होत असतानाही सरकारकडून निर्यात सुरू असल्याने ग्राहकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उष्ण तापमान आणि लांबलेला मान्सून यामुळे हिरव्या मिरचीचे आणि आल्याचे दर कडाडले आहेत.