केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सोमवारी महिला स्वयं-सहायता गटांनी (SHGs) बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. देशभरातील महिला बचत गटांनी आर्थिक सक्षमतेसाठी सुरु केलेला उद्योग आता सातासमुद्रापार देखील पोहोचणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 'ई-सरस' नावाने एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरु केले आहे. सुरुवातीला केवळ ग्रामीण आणि आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू यावर विक्रीसाठी होत्या. आता मात्र बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री देखील या पोर्टलवर करता येणार आहे.
दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत बचत गटातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. डिजिटल इंडिया या अभियानाचा भाग म्हणून भारतीय हस्तकला, कलाकुसर यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
On June 28, 2023, The honorable Secretary of Rural Development, Mr. Shailesh Kumar Singh, inaugurated the e-Saras Fulfillment Center and launched the e-Saras Mobile App.#Mord #sarasaajeevika #handicraft #WomenEmpowerment #womensupportingwomen #ecommerce #onlinestore #EidMubarak pic.twitter.com/QLy0hpQyQ4
— Saras Aajeevika (@esarasaajeevika) June 29, 2023
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM), ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD), भारत सरकारच्या पुढाकाराने ग्रामीण भारतातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी एक कार्यक्षम आणि विकसित करण्यात आले आहे. हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म स्वयं-व्यवस्थापित बचत गट (SHG) आणि साप्रभावी ऑनलाइन पोर्टल सामाजिक संस्थांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करता येणार आहे.
मध्यस्थांची गरज नाही!
याआधी आदिवासी, ग्रामीण कलाकारांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात होते. यामध्ये अनेकदा आयोजक कलाकारांकडून विक्रीसाठी पैशांची मागणी करत. यामुळे कलाकारांचे आर्थिक नुकसान होत होते आणि त्यांना योग्य मोबदला दिला जात नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. आता थेट महिला बचत गटाची उत्पादने, आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी उत्पादित केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू 'ई-सरस' वर विकता येणार आहेत.