Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Khasra Number : शेतकरी योजनांसाठी आवश्यक असणारा खसरा नंबर म्हणजे नेमके काय?

What is Khasra Number : शेतकरी योजनांसाठी आवश्यक असणारा खसरा नंबर म्हणजे नेमके काय?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. हा अर्ज दाखल करत असताना तु्म्हाला तुमच्या शेत जमिनी विषयीची अचूक आणि अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचा सातबारा, आठ-अ यातील गट नंबर, सर्व्हे क्रमांक, भूमापन क्रमांक किंवा खसरा क्रमांकाचा तपशील तुम्हाला द्यावा लागतो.

केंद्र अथवा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना असेल. पंतप्रधान पीक विमा योजना असेल, किंवा  राज्य शासानाच्या कृषी विभागाकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. राज्य अथवा केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांना आपली नावनोंदणी आणि योजनेसाठी अर्ज करणे गरजेचे असते. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करत असताना बऱ्याचवेळा खसरा क्रमांक (Khasara No.) किंवा नंबर विचारल जातो. नेमके खसरा म्हणजे काय हे आज आपण जाणून घेऊयात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. हा अर्ज दाखल करत असताना तु्म्हाला तुमच्या शेत जमिनी विषयीची अचूक आणि अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचा सात बारा वर नमुद करण्यात आलेला गट / सर्व्हे क्रमांक किंवा खसरा क्रमांकाचा तपशील तुम्हाला द्यावा लागतो.

खसरा क्रमांक म्हणजे काय? What is Khasra Number 

खसरा म्हणजे तुमच्या शेत जमिनीचा एक प्रकारचा ओळख क्रमांक आहे. 7/12 किंवा 8 अ उताऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशीलवार आणि अधिकृत माहिती उपलब्ध होते. मात्र, गाव नमुन्यात तुमचा मालकी हक्क असेलल्या या जमिनीची नोंदीसाठी क्रमांक देण्यात आलेले असतात. महसूल विभागाकडून जमिनीच्या गटाला हा क्रमांक दिला जातो. गाव नमुना 7 च्या उताऱ्यावर भूमापन, सर्व्हे, गट नंबर  आणि हिस्सा या संज्ञेखाली त्याला उल्लेख करण्यात आलेला असतो. त्यालाच खसरा क्रमांक असेही संबोधले जाते. विशेषत: नागपूर विभागात जमिनीच्या नोंदीसाठी खसरा क्रमांक ही संज्ञा वापरली जाते.

जमिनीचा संपूर्ण तपशील-

7/12 उताऱ्यावर तुमच्या जमिनीची ओळख दर्शविण्यासाठी गट नंबर अथवा, खसरा नंबर नमुद करण्यात आलेल्या असतो. या नोंदीनुसार तुमच्या जमीनीचा सर्व प्रकारचा तपशील प्राप्त होतो. त्यामध्ये जमीनाचा प्रकार, क्षेत्रफळ, पीकपेरा, भोगवटदार इत्यादी माहितीचा समावेश असतो.